• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Indiafirst Life Will Also Expand Its Bancassurance Agency Network

IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफचा बँकाश्युरन्सवर ठाम विश्वास; मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही करणार विस्तार

इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स ही विमा कंपनी, 'बँकाश्युरन्स' म्हणजेच बँकेमार्फत विमा विक्री प्रणाली आधारेच विमा वितरणाला प्राधान्य देणार यावर ठाम आहे. परंतु बाजार पुढील काळात कसा वाढतो यावर कंपनी बाँड फॉरवर्ड्सकडे वळू शकेल.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 17, 2025 | 12:34 PM
IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफचा बँकाश्युरन्सवर ठाम विश्वास; मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही करणार विस्तार

IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफचा बँकाश्युरन्सवर ठाम विश्वास; मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही करणार विस्तार (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्सने ‘बँकाश्युरन्स’वर दिला भर
  • मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही विस्तार
  • IPO पुढे ढकलला, रद्द नाही; बाजारस्थितीवर निर्णय अवलंबून
 
IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स (IndiaFirst Life Insurance) ही विमा कंपनी, विमा क्षेत्रात ‘बँकाश्युरन्स’ (Bancassurance) म्हणजेच बँकेमार्फत विमा विक्री प्रणाली आधारेच विमा वितरणाला प्राधान्य देणार आहे. या वितरण प्रणालीवर नियामक संस्थांचे बारीक लक्ष असले, तरीही याच प्रणालीला आपल्या वितरण धोरणाचे मुख्य केंद्र मानते असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गांधी यांनी ठामपणे सांगितले. बँकाश्युरन्स हा कंपनीच्या वितरण धोरणाचा गाभा आहे आणि त्यातून व्यवसायाचे उत्कृष्ट परिणाम मिळत आहेत असंही गांधींनी अधोरेखित केलयं.

चालू आर्थिक वर्ष म्हणजेच, २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत, इंडियाफर्स्ट लाईफने ४४% ची दमदार वाढ नोंदवली. ही वाढ मुख्यत्वे त्यांच्या बँक भागीदारांच्या मजबूत कामगिरीमुळे झाली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने २२% आणि युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) ने १७% वाढीस हातभार लावला. त्याच काळात, कंपनीच्या खासगी एजंट मार्फत विक्रीतही दमदार वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एजंट मार्फत झालेल्या विक्रीत पाचपट वाढ झाली आहे. ग्रामीण भागात प्रादेशिक बँकांच्या विलीनीकरणामुळे वितरणावर काही काळ परिणाम झाला असला तरी, बँकांची पुनर्रचना आता पूर्ण होत आली आहे. त्यामुळे आता परिस्थिती स्थिर होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा: YONO 2.0 Launch: खराब नेटवर्कमुळे ऑनलाइन पेमेंटला येतो अडथळा? आता काळजी नाही; SBI ने आणलंय नवं पेमेंट अ‍ॅप

एजन्सी नेटवर्कच्या विस्तारासाठी भरीव गुंतवणूक करण्यात आली आहे. तरी इंडियाफर्स्ट लाईफला आपला ‘व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस’ मार्जिन गेल्या वर्षीच्या १७.६ टक्क्यांहून अधिक राहण्याची अपेक्षा आहे. ऋषभ गांधींनी या यशाचे श्रेय व्यवसायाच्या सुधारित गुणवत्तेला, पॉलिसी टिकवून ठेवण्याच्या विक्रमी दराला आणि कंपनीच्या स्थापनेपासून ‘बँकाश्युरन्स’ मार्फत झालेल्या विक्रीतून कमीत कमी तक्रारींना दिले आहे.
कंपनी आता केवळ बँकांपुरती मर्यादित न राहता सगळीकडे आपली उपस्थिती वाढवत आहे. गेल्या आर्थिक वर्षात, एजंटच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करण्यात आला. या वर्षी तो २०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.

इंडियाफर्स्ट लाईफ चालू आर्थिक वर्षाचा शेवट ९६ शाखा आणि दहा हजारहून अधिक एजंटांसह करण्याच्या मार्गावर आहे. कंपनीला त्यांच्या बँक भागीदारांद्वारे २५ कोटी ग्राहकांपर्यंत पोहोचता आले आहे, आता एजंटच्या नेटवर्कच्या विस्ताराने त्यांना आणखी मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी सुमारे दोन तृतीयांश हिस्सा ‘बँकाश्युरन्स’चा राहिला. उरलेला एक तृतीयांश हिस्सा एजन्सी आणि इतर माध्यमांचा राहिला. त्यात ब्रोकिंग, थेट विक्री आणि डिजिटल माध्यमांचा समावेश आहे. पूर्वी बँकाश्युरन्सचा वाटा एकूण व्यवसायात ९० टक्क्यांहून अधिक होता. पण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे.

हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजारात आज होणार दमदार सुरुवात! कोणते शेअर्स चमकणार? जाणून घ्या सविस्तर

इंडियाफर्स्ट लाईफ भविष्यात आरोग्य आणि सर्वसाधारण विमा क्षेत्रातील संधींचे देखील मूल्यांकन करत आहे. परंतु कंपोझिट परवान्यासंबंधी स्पष्टतेची वाट पाहत आहे. कंपनीने आपले आयपीओ (IPO) पुढे ढकलले आहेत, रद्द केलेले नाहीत असे स्पष्ट केले आहेत. आयपीओची वेळ बाजाराची परिस्थिती अनुकूल असण्यावर आणि भविष्यतील तिमाहींमध्ये वाढ कायम राहण्यावर अवलंबून असेल. बाजाराची स्थिती आणि बाहेरची आव्हाने मर्यादित असणे यावरही वेळ अवलंबून असेल. अंतिम निर्णय भागधारक घेतील. असेही कंपनीने स्पष्ट केले.

इंडियाफर्स्ट लाईफ ग्राहक परतावा आणि अपेक्षित गुंतवणूक कामगिरी यांच्यात किमान २०० बेसिस पॉइंट्सचे अंतर राखते. कंपनीची ताळेबंद आणि ग्राहकांना दिलेली दीर्घकालीन हमी दोन्ही सुरक्षित ठेवते. सुमारे ७५ टक्के पोर्टफोलिओ फॉरवर्ड रेट ऍग्रीमेंट्सद्वारे व्याज दराचा धोका सांभाळण्यास मदत होते. एलआयसीने (LIC) एफआरए बाजारात प्रवेश केल्यामुळे पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. बाजार पुढील काळात कसा वाढतो यावर भविष्यात कंपनी बाँड फॉरवर्ड्सकडे वळू शकते. इंडियाफर्स्ट लाईफ एजटंमार्फत विस्ताराला गती देण्यात आली असली किंवा नवीन संधी शोधत असली तरीही, ‘बँकाश्युरन्स’ हाच कंपनीचा मुख्य आधारस्तंभ राहील.

Web Title: Indiafirst life will also expand its bancassurance agency network

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Bank OF Baroda
  • IPO
  • LIC
  • Union Bank of India

संबंधित बातम्या

IPO Market 2025: आयपीओ फंडरेझिंगमध्ये हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर, भारताची देखील विक्रमी कामगिरी
1

IPO Market 2025: आयपीओ फंडरेझिंगमध्ये हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर, भारताची देखील विक्रमी कामगिरी

पैसे तयार ठेवा! KSH इंटरनॅशनलचा IPO ‘या’ दिवशी उघडणार, कंपनीचा निधी वापरण्याचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन
2

पैसे तयार ठेवा! KSH इंटरनॅशनलचा IPO ‘या’ दिवशी उघडणार, कंपनीचा निधी वापरण्याचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
3

ICICI Asset Management: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लवकरच शेअर बाजारात! प्रुडेंशियलच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफचा बँकाश्युरन्सवर ठाम विश्वास; मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही करणार विस्तार

IndiaFirst Life Insurance: इंडियाफर्स्ट लाईफचा बँकाश्युरन्सवर ठाम विश्वास; मजबूत वाढीदरम्यान एजन्सी नेटवर्कचाही करणार विस्तार

Dec 17, 2025 | 12:34 PM
Sindhudurga: ‘… अन्यथा बंद कायम’; ‘त्या’ प्रकरणात डॉक्टरांचा प्रशासनाला गर्भित इशारा

Sindhudurga: ‘… अन्यथा बंद कायम’; ‘त्या’ प्रकरणात डॉक्टरांचा प्रशासनाला गर्भित इशारा

Dec 17, 2025 | 12:33 PM
Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून  रंगेहात अटक

Palghar News: ग्रामपंचायतच्या ना-हरकत दाखल्यासाठी 20 हजारांची मागणी, ग्रामविकास अधिकाऱ्याला ACB कडून रंगेहात अटक

Dec 17, 2025 | 12:32 PM
US Venezuela Ban : दक्षिण अमेरिकेत तणावाचे वातावरण; ट्रम्प यांनी दिले व्हेनेझुएलावर नाकाबंदीचे आदेश

US Venezuela Ban : दक्षिण अमेरिकेत तणावाचे वातावरण; ट्रम्प यांनी दिले व्हेनेझुएलावर नाकाबंदीचे आदेश

Dec 17, 2025 | 12:10 PM
शेतकऱ्यांच्या दूध बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; 7 दिवसांत थकीत रक्कम न दिल्यास…

शेतकऱ्यांच्या दूध बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; 7 दिवसांत थकीत रक्कम न दिल्यास…

Dec 17, 2025 | 12:09 PM
आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा

आता महागडे बदाम खाणे सोडा, मेमरी पॉवर वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते 50 रुपयांच्या या पदार्थाचे सेवन; अभ्यासात झाला खुलासा

Dec 17, 2025 | 12:01 PM
गौरव खन्नाला लागला मोठा झटका! Youtube चॅनल सुरु करताच अवघ्या २४ तासांत झाले बंद; नेमकं घडलं काय?

गौरव खन्नाला लागला मोठा झटका! Youtube चॅनल सुरु करताच अवघ्या २४ तासांत झाले बंद; नेमकं घडलं काय?

Dec 17, 2025 | 12:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM
Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Pimpri-Chinchwad : महाविकासआघाडीच्या बैठकीत मनसेचा सहभाग

Dec 16, 2025 | 08:06 PM
Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Kolhapur Corporation Elections : हद्दवाढ कृती समितीच्या वतीने महापालिकेसमोर शंखनाद आंदोलन

Dec 16, 2025 | 07:58 PM
Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Kolhapur News : शिवसेना कुणाच्याही दावणीला बांधायला शिवसेना कमजोर नाही-अरुण दुधवडकर

Dec 16, 2025 | 07:51 PM
Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Ahilyanagar : सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढू ; वंचितकडून महाविकास आघाडीला अल्टिमेटम

Dec 16, 2025 | 07:45 PM
Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Sindhudurg : खाजगी रुग्णालये बंद, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी

Dec 16, 2025 | 03:12 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.