भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलचे पेट्रोल-डिझेलवर मोठं वक्तव्य (फोटो सौजन्य-X)
Indian Oil news : भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 8 मे रोज संध्याकाळपासून दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या भागात अनेक तणावच्या घटना घडत आहेत. या युद्धानंतर सामान्य नागरिकांकडून जीवनाश्यक वस्तूंचा साठा घरात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहगे. आणीबाणीच्या काळात लागू शकतं म्हणून एलपीजी , पेट्रोल-डिझेल, अन्न, पेय, औषधांसह जीवनाश्यक वस्तू गोळा करण्याची ही अफवादेखील पसरत आहे.
याचदरम्यान आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने देशवासियांना आश्वासन दिले आहे की, देशभरात इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नसून कंपनीने शुक्रवार, ९ मे रोजी सकाळी ५:१२ वाजता त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एका पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. पोस्टमध्ये म्हटले आहे की इंडियन ऑइलच्या पुरवठा लाइन सुरळीतपणे कार्यरत आहेत आणि सर्व आउटलेटवर इंधन आणि एलपीजीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
#IndianOil has ample fuel stocks across the country and our supply lines are operating smoothly.
There is no need for panic buying—fuel and LPG is readily available at all our outlets.
Help us serve you better by staying calm and avoiding unnecessary rush. This will keep our…
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) May 9, 2025
इंडियन ऑइलने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “#इंडियन ऑइलकडे देशभरात पुरेसा इंधन साठा आहे आणि आमच्या पुरवठा मार्ग सुरळीतपणे सुरू आहेत. घाबरून खरेदी करण्याची गरज नाही – आमच्या सर्व आउटलेटवर इंधन आणि एलपीजी सहज उपलब्ध आहेत. कृपया शांत रहा आणि आमच्या चांगल्या सेवेसाठी अनावश्यक गर्दी टाळा. यामुळे आमच्या पुरवठा मार्ग सुरळीत चालू राहतील आणि सर्वांना इंधनाचा अखंड प्रवेश सुनिश्चित होईल.”
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आहे, जी तेल, वायू, पेट्रोकेमिकल्स आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या संदेशाद्वारे, इंडियन ऑइलने केवळ आपली तयारी दर्शविली नाही तर नागरिकांना एकता आणि समजूतदारपणाचे आवाहन केले जेणेकरून पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही आणि सर्वांना आवश्यक संसाधने मिळत राहतील.
संपर्क आणि अधिक माहितीसाठी:
इंडियन ऑइलची अधिकृत वेबसाइट: iocl.com
ग्राहक सेवा क्रमांक: १८००२३३३५५५
एलपीजी सेवांसाठी: इंडेन एलपीजी चौकशी पोर्टल
इंडियन ऑइलने लोकांना अफवांवर लक्ष देऊ नका आणि कोणत्याही माहितीसाठी अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून हे आश्वासन देण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. बुधवारी भारताने दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, असे म्हटले आहे. नंतर, पाकिस्ताननेही भारतावर ड्रोनने हल्ला केला पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना हवेतच उद्ध्वस्त केले. या वाढत्या संघर्षामुळे दोन अण्वस्त्रधारी देशांमधील पूर्ण लष्करी संघर्षाची भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे संसाधनांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, इंडियन ऑइलचे हे विधान केवळ इंधनाच्या उपलब्धतेबाबत लोकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न नाही तर या संकटाच्या काळात पुरवठा साखळी अखंडित ठेवण्याची वचनबद्धता देखील दर्शवते, जेणेकरून युद्धासारख्या परिस्थितीतही देशाच्या ऊर्जेच्या गरजांवर परिणाम होणार नाही.