Jio New Year Offer: नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात! जिओचे ‘Happy New Year 2026’ ऑफर्स लाँच (फोटो-सोशल मीडिया)
Jio New Year Offer: आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने २०२६ च्या नवीन वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या हॅपी न्यू इयर २०२६ ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये परवडणाऱ्या किमतीत प्रगत डिजिटल सेवा, दीर्घ वैधता, अमर्यादित 5Gआणि प्रीमियम ओटीटी कंटेंट आहे. रिलायन्स जिओने हॅपी न्यू इयर २०२६ ऑफर लाँच केल्या आहेत, ज्यामध्ये अमर्यादित 5G, १५ हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म आणि गुगल जेमिनी प्रो सारखे फायदेशीर ऑफर मिळणार आहे. हा एक खास प्लॅन असणार आहे. सविस्तर जाणून घेऊया..
नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये १०३ रुपयांचा फ्लेक्सी पॅक, ५०० रुपयांचा सुपर सेलिब्रेशन मंथली प्लॅन आणि ३५९९ रुपयांचा हिरो वार्षिक रिचार्ज प्लॅन समाविष्ट आहे. १०३ रुपयांचा फ्लेक्सी पॅक २८ दिवसांसाठी ५ जीबी डेटा, तसेच हिंदी, आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक मनोरंजन पॅकमधून निवड करण्याचा पर्याय देतो. वापरकर्ते त्यांच्या भाषा आणि आवडीनुसार ओटीटी सेवा वापरू शकतात.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरात मोठा बदल? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव
दुसरे म्हणजे, ५०० रुपयांचा सुपर सेलिब्रेशन मंथली प्लॅन अमर्यादित ५जी, दररोज २ जीबी डेटा आणि २८ दिवसांच्या वैधतेसह कॉलिंग वैशिष्ट्ये प्रदान करतो. या प्लॅनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात १५ हून अधिक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश आहे, ज्यामध्ये यूट्यूब प्रीमियम, जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन आणि सोनी लिव्ह झी५ यांचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये १८ महिन्यांचा गुगल जेमिनी प्रो प्लॅन देखील आहे.
तिसरे म्हणजे, ३५९९ रुपयांचा हिरो वार्षिक रिचार्ज प्लॅन वर्षभर अखंड कनेक्टिव्हिटी देतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित एसजी, दररोज २.५ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल आणि ३६५ दिवसांच्या वैधतेसह दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये १८ महिन्यांचा गुगल जेमिनी प्रो प्लॅन देखील येतो, ज्याची किंमत अंदाजे ३५,१०० रुपये आहे. या न्यू एअर ऑफरमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.






