फोटो सौजन्य: LinkedIn
एरवी शिक्षण झाल्यानंतर अनेक जण नोकरीच्या शोधात वेगवेगळ्या कंपनीत आपला CV घेऊन इंटरव्ह्यू देत असतात. काही जणांना लगेच नोकरी मिळते तर काही जणांना खूप वेळ नोकरीसाठी आपले पाय झिजवावे लागतात. कालांतराने जेव्हा आपल्याला नोकरी मिळते तेव्हा आपण त्यात गुरफटून जातो. एरवी शाळेत एका जागेवर तासभर सुद्धा न बसणारे आपण कंपनीच्या ऑफिसमध्ये दहा-दहा तास बसत असतो. नोकरीमुळे आपण आर्थिकदृष्ट्या स्थिर होतो, आपल्याकडे पैसे येतात, घराची जबाबदारी आपली होते. पण जर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले तर? काही जणांना हा विचार सुद्धा धडकी भरवणारा असतो. पण अशीच काहीशी घटना मुंबईतल्या कांदिवलीत राहणाऱ्या कमलेश कामतेकर सोबत घडली आहे.
बाजार घसरणीतही ‘हा’ शेअर लागतोय अप्पर सर्किटला; 15 टक्क्यांच्या उसळीमुळे गुंतवणूकदार सुखावले!
नोकरी म्हणजे आपल्या सर्वांसाठी उदरनिर्वाहाचे एक प्रमुख साधन आहे. पण हल्लीच्या कॉर्पोरेट विश्वात कधी कोणत्या वेळी एखाद्या व्यक्तीला बाहेरचा रस्ता बघायला मिळेल, हे सांगू शकत नाही. त्यात आता AI मुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. काही वेळेस तर कंपन्या अचानकच कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ देत असतात. अशा घटनांमुळे एखाद्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होऊ शकते. अशीच काहीशी घटना कमलेश कामतेकर सोबत घडली आहे, ज्याला अचानक कंपनीने नोकरीवरून काढून टाकले. पण इतरांसारखे घाबरून न जात कमलेशने एक धाडसी निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे स्वतःची रिक्षा चालवण्याचा निर्णय.
कमलेश कामतेकर हे एक ग्राफिक डिझायनर असून मुंबईतल्या कांदिवली शहरात ते त्यांच्या कुटुंबासोबत राहत आहे. त्यांना ग्राफिक डिझायनिंग क्षेत्रात 14 वर्षाचा अनुभव आहे. याच अनुभवामुळे ते एका कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होते. परंतु कॉस्ट कटिंगमुळे कंपनीने त्यांना नोकरीवरून काढून टाकले. यानंतर कमलेश यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या कंपनीत इंटरव्ह्यू दिले पण काही कारणास्तव त्यांना अपयश येत होते. काही कंपन्यांनी तुम्ही कमी पगारात काम करू शकता का? असा प्रश्न देखील कमलेश यांना विचारला होता. पण 14 वर्षाचा अनुभव हाती असताना कमी पगारात काम करणे स्वाभिमानी कमलेश यांना मान्य नव्हते. यादरम्यान ते 5 महिने बेरोजगार होते. पण विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी आणि कुटुंबाने त्यांना या कठीण काळात साथ दिली.
सततच्या रिजेक्शनमुळे आणि कमी पगारात काम करू शकता का? अशा प्रश्नामुळे कमलेश कामतेकर यांनी
शेवटी एक धाडसी निर्णय घेतला. आणि तो निर्णय होता स्वतःची रिक्षा चालवण्याचा. त्यांनी हा निणर्य LinkedIn वर पोस्ट केला आहे . या पोस्ट मध्ये ते म्हणतात,” या फीडबॅकनंतर, मी विचार केला की दुसरीकडे कुठे काम करण्याऐवजी मी कमी पैश्यात स्वतःचा बिझनेस का नाही सुरु करावा? निदान माझ्याजवळ स्वतःची कमाई असेल. मग मी ठरवलं ‘भाड़ में जाए नौकरी, अब खुद का बिझनेस करेंगे’ पण माझ्या क्षेत्रात नाही.
सोशल मीडियावर कमलेशची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. अनेक जणांनी त्यांच्या या धाडसी निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच अनेक कंपन्या आता कमलेशसोबत संपर्क साधत आहे.






