• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • A Reassuring Decision For Unemployed Youth In The State

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक निर्णय! ७० हजार पदांची नोकरभरती नव्या पद्धतीने केली जाणार

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक निर्णय घेत लवकरच सुमारे ७० हजार पदांची नोकरभरती नव्या पद्धतीने केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 09, 2026 | 08:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी दिलासादायक बातमी असून, लवकरच सुमारे ७० हजार पदांची नोकरभरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, ही भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून, त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सुमारे २० हजार पदे आणि आयोगाबाहेरील विविध विभागांतील पदांचा समावेश असणार आहे. भरती करताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश नियम, पात्रता आणि कामाच्या स्वरूपाचा विचार करून निर्णय घेतले जातील, असे निर्देशही त्यांनी दिले.

आरटीई नोंदणीची स्थिती! ७९० शाळा देणार मोफत प्रवेश; आरटीई नोंदणीची उत्तम स्थिती, ८६११ जागा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते. बैठकीत राज्य प्रशासनात सर्वांगीण सुधारणा वेगाने राबवण्यावर भर देण्यात आला. मनुष्यबळ व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक विभाग नसून, राज्य शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. विविध विभागांमध्ये ७० हजार पदे भरल्यानंतर प्रशासनाची कार्यक्षमता निश्चितच वाढेल. यामुळे नागरिकांना सेवा अधिक जलद, प्रभावी आणि दर्जेदार मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेल्या मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेलचा उल्लेख केला. हे मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले असून, प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रांची मागणी, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर भरती प्रक्रियांमध्येही हेच मॉडेल वापरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि वेगवान असणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. युवकांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि तंत्रज्ञानाधारित असावी, यावरही त्यांनी भर दिला.

येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यामध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. कोणताही विभाग मागे न राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या निर्णयामुळे राज्यातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, शासनाच्या कार्यपद्धतीतही सकारात्मक बदल घडून येणार आहेत.

Web Title: A reassuring decision for unemployed youth in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • Career

संबंधित बातम्या

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…
1

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य
2

Middle East मध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, समोर आले बनावट सर्क्युलरचे सत्य

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’
3

पेपरमध्ये खुणा, तर मानला जाईल गुन्हा! परीक्षेत्तर गैरमार्गांवर कडक कारवाई; बोर्डाने व्हिडीओद्वारे जारी केली ‘शिक्षासूची’

एमबीएसाठी १. ८० लाख परीक्षार्थी! अर्जातील दुरुस्तीसाठी २८ फेब्रु. ते २ मार्चदरम्यान सुविधा
4

एमबीएसाठी १. ८० लाख परीक्षार्थी! अर्जातील दुरुस्तीसाठी २८ फेब्रु. ते २ मार्चदरम्यान सुविधा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मैदानात पत्नीने घेतली बुमराहची ‘विकेट’! भर शोमध्ये पतीलाच दिले इंग्रजीचे धडे; मजेशीर VIDEO VIRAL…

मैदानात पत्नीने घेतली बुमराहची ‘विकेट’! भर शोमध्ये पतीलाच दिले इंग्रजीचे धडे; मजेशीर VIDEO VIRAL…

Mar 02, 2026 | 08:23 PM
Holi 2026 : होळीच्या दिवशी सफेद कपडेच का घातले जातात? चोचले नाही तर परंपरेशी जोडले आहे खास कारण

Holi 2026 : होळीच्या दिवशी सफेद कपडेच का घातले जातात? चोचले नाही तर परंपरेशी जोडले आहे खास कारण

Mar 02, 2026 | 08:15 PM
Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’;  वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन

Transport News: ‘अन्यायकारक E-Challan रद्द…’; वाहतूक संघटनांना प्रताप सरनाईकांचे आवाहन

Mar 02, 2026 | 08:01 PM
‘पापा, मी बेडखाली लपून राहीन,’ Ammy Virkची मुलगी युएईमध्ये अडकली, इराण-इस्रायल युद्धामुळे गायक चिंतेत

‘पापा, मी बेडखाली लपून राहीन,’ Ammy Virkची मुलगी युएईमध्ये अडकली, इराण-इस्रायल युद्धामुळे गायक चिंतेत

Mar 02, 2026 | 08:01 PM
Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Israel-Iran War: इराणला मोठा धक्का! खामेनेईंच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू; इस्रायली हल्ल्यात झाल्या होत्या गंभीर जखमी

Mar 02, 2026 | 08:00 PM
Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Ahilyanagar News: मढीची कानिफनाथ यात्रा यंदाही वादाच्या भोवऱ्यात! मुस्लिम व्यवसायिकांना विरोध कायम

Mar 02, 2026 | 07:54 PM
T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

T20 World Cup 2026: सेमीफायनलच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर विजेता कसा ठरणार? ICC चे नियम काय सांगतात?

Mar 02, 2026 | 07:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.