केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात महायुतीचा मोठा विजय
भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष
पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसने राखला गड
पुणे: आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने मोठे यश प्राप्त केला आहे. राज्यात भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषद, महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. यावर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालाने भारतीय जनता पक्ष हाच राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पुणेकरांसह महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास या निकालातून अधोरेखित होत आहे”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Maharashtra Politics: “उबाठामध्ये आणि मविआमध्ये…”; सिंधदुर्गमधील विजायवर नितेश राणेंचा टोला
“पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे व उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील बारा जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले. हे भाजपच्या भक्कम जनाधाराचे प्रतीक असल्याचे”, मोहोळ म्हणाले.
“पुणे शहराने आपली वेगळी राजकीय संस्कृती जपली आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या प्रति संवेदना व्यक्त सर्वपक्षीय नेत्यांनी महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय एकमताने घेतला. शहराच्या राजकीय संस्कृतीचे हे उदाहरण आहे,” असे मोहोळ म्हणाले.
“… हे स्पष्ट झाले आहे”; जिल्हा परिषदेच्या निकालावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे भाष्य
“पुणेकरांनी भाजपला पुन्हा लोकसेवेची संधी दिली असून, महापालिका प्रशासन व जनतेतील दुवा असलेले नगरसेवक नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडवतील; तसेच शहराच्या भविष्याचा विचार करत धोरणात्मक निर्णय घेतले जातील. पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर घडवायचे आहे. त्यासाठी पुढील शंभर वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधा व विकास प्रकल्प साकारले जातील. महापालिका निवडणुकीतील विजय ही जबाबदारी असून, पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम महापालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक करतील,” असा विश्वासही मोहोळ यानी व्यक्त केला.






