कोटक ८११ ने लॉन्च केले '३ इन १ सुपर खाते'!
मुंबई, २९ ऑक्टोबर २०२५ : भारतातील आघाडीचे डिजिटल बँकिंग व्यासपीठ असलेल्या ‘कोटक८११’ने ‘३ इन १ सुपर खात्या’चे अनावरण केले. ज्यामध्ये बचत खाते, मुदत ठेव आणि सुपर. मनीचे सुरक्षित क्रेडिट कार्ड खातेधारकांना एकाच वेळी उपलब्ध होणार आहे. ‘३ इन १ सुपर बँक खाते’ ही योजना संपूर्ण भारतासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. हा सामान्य भारतीयांचा एक मोठा आणि वाढता वर्ग असून ज्यात त्यांना साधी, डिजिटल-जलद आर्थिक साधने/सुविधा हव्या आहेत.
यात पगारदार व्यक्ती, डिजिटलस्नेही, विद्यार्थी, पहिल्यांदाच नोकरी करणारे आणि बरेच काही समाविष्ट आहे. हे असे वापरकर्ते आहेत जे छोटीशी सुरुवात करून, नियंत्रणात राहून आणि त्यांच्या पैशातून अधिक परतावा मिळवू इच्छितात. ‘३ इन १ सुपर खाते’ वापरण्यास सोपे उपाय त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले आहे.
‘कोटक८११’चे प्रमुख मनीष अग्रवाल म्हणाले, की ‘३ इन १ सुपर खाते’ बचत, खर्च आणि कर्ज घेणे एकाच ठिकाणी एकत्र उपलब्ध करते. हे अशा लोकांसाठी बनवले आहे जे कागदपत्रे किंवा गुंतागुंतीशिवाय पैसे अधिक चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू इच्छितात. हे सोपे, सुरक्षित आणि दैनंदिन वापरासाठी डिझाइन केलेले आहे.’
| वैशिष्ट्य | फायदे |
| गुंतवणुकीची सुरुवात | ₹१,००० पासून मुदत ठेव (FD) योजनेत सहभागी व्हा. |
| जास्त कमाई | तुमच्या FD वर आकर्षक व्याज + क्रेडिट कार्डवरील खर्चावर कॅशबॅक मिळवा. |
| क्रेडिटवर UPI वापर | नेहमीप्रमाणे UPI द्वारे पेमेंट करा आणि बक्षिसे (Rewards) मिळवा. |
| सुरक्षित क्रेडिट कार्ड | उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय, तुमच्या FD च्या आधारावर सुरक्षित ‘कोटक८११’-सुपर.मनी क्रेडिट कार्ड मिळवा. |
| डिजिटल प्रक्रिया | संपूर्ण प्रक्रिया १००% डिजिटल असून, कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. |
| खर्चावर नियंत्रण | तुमची FD ची रक्कमच तुमची खर्च मर्यादा (Credit Limit) निश्चित करते, ज्यामुळे नियंत्रण राखता येते. |
Flight Ticket: ‘या’ विमानाचे तिकीट फक्त 11 रुपये! विमान वाहतूक कंपनीच्या ऑफरनं खळबळ
आमचे ग्राहक ‘कोटक८११’च्या डिजिटल-फर्स्ट वापरकर्त्यांशी जुळतात, ज्यांना गोष्टी सोप्या आणि फायदेशीर बनवायच्या आहेत. पैसे देण्याइतकेत ‘क्रेडिट’ व्यवहार सुलभ करण्यासाठी आम्ही विश्वासार्ह बँकिंग आणि डिजिटल-फर्स्ट उपक्रमाचे मिश्रण करत आहोत’, असे ‘सुपर.मनी’चे संस्थापक प्रकाश सिकारिया म्हणाले.
‘कोटक८११’चे सह-प्रमुख जय कोटक पुढे म्हणाले, की ‘कोटक८११’ हे संपूर्ण भारतातील विस्तृत प्रेक्षकांना सेवा देते जे आर्थिकदृष्ट्या पुढे जाण्यासाठी व्यावहारिक मार्ग शोधत आहेत. हे वापरकर्ते डिजिटल-जाणकार आहेत, परंतु ‘क्रेडिट’बाबत सावध आहेत. त्यांना नियंत्रण, स्पष्टता आणि मूल्य हवे आहे. ‘३ इन १ सुपर खाते’ अशा ग्राहकांसाठी पूर्णत: मिळतेजुळते असून, हे खाते सुरू करणे सोपे आहे, वापरण्यास सोपे आहे आणि लोकांना त्यांच्या पैशांबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यास मदत करते’.






