SBI कर्मचाऱ्यांचा मोठा संप! (Photo Credit- X)
यूनियनने दिलेल्या माहितीनुसार, २५ आणि २६ मे २०२६ रोजी देशभरातील एसबीआय कर्मचारी कामावर बहिष्कार टाकतील. विशेष म्हणजे, या दिवसांना जोडून सार्वजनिक सुट्टी किंवा साप्ताहिक सुट्टी आल्यास हे आंदोलन २७ मे पर्यंत सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हा संप ‘इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट, १९४७’ च्या तरतुदींनुसार पुकारण्यात आला आहे.
AISBISF ने प्रशासनासमोर एकूण १६ प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाखांमधील कर्मचाऱ्यांची तीव्र टंचाई. युनियनच्या मते गेल्या ३० वर्षांपासून ‘मेसेंजर’ या पदावर नवीन भरती झालेली नाही, तर क्लार्क संवर्गातील कर्मचाऱ्यांची संख्याही सातत्याने कमी होत आहे. नियमित कामांसाठी बाह्य कर्मचाऱ्यांची (Outsource Staff) मदत घेतली जात आहे, ज्याचा परिणाम बँकिंग सेवेच्या गुणवत्तेवर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर होत असल्याचा आरोप युनियनने केला आहे.
Income Tax Return : ITR भरणं कठीण वाटतंय का? मग सोप्या ‘या’ पद्धतीने भरा इन्कम टॅक्स रिटर्न
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची यादी मोठी असून त्यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
केवळ दोन दिवसांचा संपच नाही, तर पूर्ण मे महिनाभर युनियनने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची योजना आखली आहे. यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश असेल:
१. लंच टाइममध्ये निदर्शने करणे.
२. सोशल मीडियाद्वारे जनजागृती मोहीम राबवणे.SBI
३. शांततापूर्ण मोर्चा आणि धरणे आंदोलन.
४. खासदार आणि सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करणे.
स्टेट बँकेच्या या संपामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या बँकिंग कामांवर परिणाम होऊ शकतो. गेल्या दोन वर्षांपासून व्यवस्थापनाशी संवाद साधूनही ठोस तोडगा निघाला नसल्याने हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता बँक प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






