मुंबईच्या अर्थव्यवस्थेला D2C आणि क्विक-सर्व्हिस ब्रँड्सची गती! (Photo Credit - X)
LinkedIn Top Startups Mumbai: जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्क असलेल्या लिंक्डइनने (LinkedIn) मुंबईसाठी २०२५ ची ‘टॉप स्टार्टअप्स’ (Top Startups) यादी सादर केली आहे. ही यादी व्यक्तींचे करिअर घडवू शकणाऱ्या उदयोन्मुख कंपन्यांचे वार्षिक रँकिंग आहे. कर्मचाऱ्यांची वाढ, सहभागाची आवड, रोजगाराची निवड आणि टॅलेंटचे आकर्षण यांसारख्या लिंक्डइन डेटावर आधारित ही यादी स्थानिक नोकरी शोधणाऱ्यांना शहरामधील रोजगार संधी ओळखण्यास मदत करते. या यादीतून असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत की, डी२सी (Direct-to-Consumer) ब्रँड्स आणि क्विक-सर्व्हिस प्लॅटफॉर्म्स (Quick-Service Platforms) मुंबईतील ग्राहक अर्थव्यवस्थेसाठी मुख्य चालक बनले आहेत.
क्विक-कॉमर्स युनिकॉर्न झेप्टो (Zepto) ने या यादीत मुंबईत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यानंतर कम्फर्ट-टेक ब्रँड द स्लीप कंपनी (The Sleep Company) आणि स्किनकेअर मेकर पिलग्रिम (Pilgrim) यांचा क्रमांक लागतो.
| क्रमांक | कंपनीचे नाव | श्रेणी/व्यवसाय |
| 1 | झेप्टो (Zepto) | क्विक-कॉमर्स युनिकॉर्न |
| 2 | द स्लीप कंपनी (The Sleep Company) | कम्फर्ट-टेक (Comfort-Tech) ब्रँड |
| 3 | पिलग्रिम (Pilgrim) | स्किनकेअर (Skincare) |
या तिन्ही कंपन्या वेगाने विकसित होत असून नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करत आहेत. यामुळे हे स्पष्ट होते की, थेट ग्राहक संबंध, ब्रँड नावीन्यता आणि कार्यचालन उत्कृष्टतेमुळे हे स्टार्टअप्स मुंबईत अव्वल कामगिरी करत आहेत.
या यादीतून मुंबईची ग्राहक-केंद्रित नावीन्यतेसाठी केंद्र म्हणून असलेली ताकद दिसून येते:
‘क्विक इकॉनॉमी’चा विस्तार: क्विक इकॉनॉमी आता केवळ किराणा मालापुरती मर्यादित राहिली नसून, स्नॅबिट (Snabbit 7) सारखे प्लॅटफॉर्म हायपरलोकल होम सर्व्हिसेस देत आहेत.
डी२सी ब्रँड्सची प्रगती: स्किनकेअरमध्ये फॉक्सटेल (Foxtale 5) आणि केसांच्या आरोग्यामध्ये त्राया (Traya 4) सारखे ब्रँड्स लोकप्रिय होत आहेत, जे डेटा-आधारित दृष्टिकोनातून लोकप्रिय ब्रँड्स तयार करत आहेत.
विविध क्षेत्रांचा समावेश: यादीचे वैविध्य दर्शवते की मुंबई एक बहुआयामी स्टार्टअप केंद्र बनत आहे. यात ई-फार्मामधील ट्रूमेड्स (Truemeds 6), एआय-क्लाऊड पायाभूत सुविधामधील नेयसा (Neysa 8) आणि संपत्ती व्यवस्थापनातील डिझर्व्ह (Dezerv 9) यांचा समावेश आहे.
यंदाच्या यादीत तीन नवीन प्रवेशकांसह शहरातील स्टार्टअप परिसंस्थेमध्ये स्थिर वाढ दिसून येते.
| क्रमांक | कंपनीचे नाव | क्षेत्र |
| 1. | झेप्टो (Zepto) | क्विक कॉमर्स |
| 2. | द स्लीप कंपनी (The Sleep Company) | कम्फर्ट-टेक |
| 3. | पिलग्रिम (Pilgrim) | स्किनकेअर / D2C |
| 4. | त्राया (Traya) | हेअर केअर / D2C |
| 5. | फॉक्सटेल (Foxtale) | स्किनकेअर / D2C |
| 6. | ट्रूमेड्स (Truemeds) | ई-फार्मा |
| 7. | स्नॅबिट (Snabbit) | हायपरलोकल होम सर्व्हिसेस |
| 8. | नेयसा (Neysa) | एआय-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर |
| 9. | डिझर्व्ह (Dezerv) | संपत्ती व्यवस्थापन (Wealth Management) |
| 10. | पॉकेट एफएम (Pocket FM) | ऑडिओ मनोरंजन |
लिंक्डइन टॉप स्टार्टअपमध्ये रोजगार कसा मिळवावा यासंदर्भात निराजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee) यांच्याकडून काही टिप्स:
● फक्त कोणाला कामावर ठेवत आहे हे न पाहता स्टार्टअप्स कुठे वाढत आहेत याचा मागोवा घ्या: दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत १४ नवीन कंपन्या एका विशिष्ट ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्या. तुम्हाला ते जॉब बोर्डमध्ये दिसणार नाही. लवकर गती ओळखण्यासाठी निधी, उत्पादन लाँच आणि बाजारपेठेतील विस्तार पहा.
● भावी व्यवस्थापकांचे मूल्यांकन कराल तसे संस्थापकांचे देखील मूल्यांकन करा: उच्च विकसित स्टार्टअप्समध्ये नेतृत्व शीर्षकापेक्षा तुमच्या विकासाला निर्धारित करते. संस्थापक टीम्स कशाप्रकारे तयार करतात, संवाद साधतात आणि प्रतिभावान कर्मचाऱ्यांना कायम ठेवतात हे पाहण्यासाठी लिंक्डइनचा वापर करा. प्रचारापेक्षा विश्वास आणि सुस्पष्टता महत्त्वाचे आहे.
● फक्त नाविन्यता आणणाऱ्या नाही तर शिस्तबद्धतेचे पालन करणाऱ्या व्यवसाय मॉडेल्सचा शोध घ्या: या वर्षीच्या टॉंप स्टार्टअप्सनी नाविन्यतेसह अंमलबजावणीला प्राधान्य दिले आहे. क्विक कॉमर्स नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करत आहेत, एआय पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, फिनटेक सखोलतेचे निराकरण करत आहेत. महत्त्वाकांक्षा आणि ऑपरेशनल क्षमतेचे संयोजन आहे अशा स्टार्टअप्सना प्राधान्य द्या.
● समस्यांचे निराकरण करणाऱ्या क्षेत्रांची निवड करा: यंदा टॉप स्टार्टअप्स तत्परता, गुंतागूंती किंवा विश्वासाचे निराकरण करत आहेत. साधने बदलतात, पण समस्येचे निराकरण करणे हे खरे आव्हान आहे. तुम्हाला कंपनी सामना करत असलेली समस्या समजली तर तुम्ही नेहमी समर्पकं राहाल.
Flight Ticket: ‘या’ विमानाचे तिकीट फक्त 11 रुपये! विमान वाहतूक कंपनीच्या ऑफरनं खळबळ






