नवभारत बिझनेस एक्सीलेंस समिट एंड अवॉर्ड-2025; परिवहन व्यवस्था उन्नत झाल्यास वेगाने विकास होणार -प्रताप सरनाईक (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Navabharat Business Excellence Summit and Award Marathi News: रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगले असतील आणि परिवहनाची सुलभ सुविधा असेल, तरच कोणत्याही देशात, राज्यांमध्ये उद्योग-व्यवसाय वाढू शकतो. त्यासाठी महाराष्ट्र सरकार रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर व परिवहन व्यवस्थेला उन्नत करण्यासाठी विशेष जोर देत आहे, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. बुधवारी हॉटेल ताज प्रेसीडेंटमध्ये आयोजित नवभारत-नवराष्ट्र बिझनेस एक्सीलेंस अॅवॉर्ड सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्याच्या विकासाची गती वाढवण्यासाठी परिवहन व्यवस्था सुदृढ होणे गरजेचे आहे.
सोहळ्यात विशेष चर्चेदरम्यान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, संपूर्ण मुंबई महानगरात अर्थात एमएमआर रिजनमध्ये पर्यायी परिवहन संसाधानांवर काम केले जात आहे. सोबतच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जलवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटी सेवेलाही अधिक मजबूत आणि सुरक्षित केले जात आहेत. सोहळ्यात नवराष्ट्रचे कार्यकारी संपादक संजय मलमे, नवभारतचे ब्यूरो चीफ सूर्यप्रकाश मिश्र यांनी परिवहनमंत्र्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली.
स्कूल बसेसमध्ये विद्याथ्यर्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी परिवहन विभागाच्या समितीच्या स्थापनेबाबत माहिती देताना परिवहनमंत्र्यांनी सांगितले की, अनेक स्कूल बसेसमध्ये मुलांच्या असुरक्षेसंबंधित घटना समोर आल्या आहेत. मुलांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी लवकरच स्कूल बसेससाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील.
अत्याधुनिक सुरक्षाप्रणालीविषयी परिवहनमंत्र्यांनी सांगितले की, एसटी बसेसमध्ये अत्याधुनिक सुरक्षाप्रणाली लागू करण्यात येत आहे. त्यामुळे महिल सुरक्षित प्रवास करू शकतील. नवीन एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटनसारखी अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे असतील. पुण्यासारखी घटना पुन्हा होणार नाही, शिवाय एसटीच्या चालकाची ड्युटीआधी नशेची तपासणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नवभारत बिझनेस एक्सीलेंस समिट एंड अवॉर्ड-2025; परिवहन व्यवस्था उन्नत झाल्यास वेगाने विकास होणार -प्रताप सरनाईक
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महायुती सरकारची कोणतीही योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो वा एसटीमध्ये महिला व ज्येष्ठांना मिळणारी सवलत असो, त्या बंद होणार नाही. योजना आजही सुरू आहेत आणि पुढेही सुरू राहतील. ते म्हणाले, विरोधक लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, महायुती सरकार राज्यातील जनतेच्या कल्याणाप्रती कटिबद्ध आहे. आमचे नेते एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कल्याणकारी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही सुरू राहणार आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे व इतर मोठ्या शहरांमध्ये लोकल ट्रेन, मेट्रो, टॅक्सी यासारख्या परिवहन सुविधेसह पॉड टॅक्सी आणि जलवाहतुकीवरही सरकार भर देत आहे. मुंबई एमएमआरमध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार घेता वाहनांची संख्याही फार वाढली आहे. एवढेच नाही तर खासगी वाहनांसाठी पार्किंगचीही व्यवस्था नाही. त्यामुळे यावरही सरकारकडून गाईडलाईनची गरज आहे. खासगी परिवहनाच्या ऐवजी सार्वजनिक परिवहनावर विशेष लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.
नवभारत बिझनेस एक्सीलेंस समिट एंड अवॉर्ड-2025; परिवहन व्यवस्था उन्नत झाल्यास वेगाने विकास होणार -प्रताप सरनाईक
परिवहनमंत्र्यांनी सांगितले की, एसटीच्या ताफ्यात सध्या १४ हजार ८०० गाड्या आहेत. एसटीकडे नवीन सुरक्ष उपकरण नाही, हे सरनाईक यांनी मान्य केले. एसटीच्या ताफ्यात आतापर्यंत २ हजार ६५० नवीन बसेस येणार आहेत. या बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस, पॅनिक बटन आदी अत्याधुनिक सुरक्षाप्रणाली असणार आहे. एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, परिवहन सेवा कधीही फायद्यात नसते, सर्वसामान्य जनतेच्या सेवेच्या दृष्टीने ही सेवा चालवली जाते. डीझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे, मात्र दीर्घ काळापासून तिकिटाच्या दरात वाढ न झाल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला. आता भाड्यात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. सरनाईक म्हणाले, राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये परिवहन सेवेला चालना देण्यात येत आहे.परिवहन विभागाने आपले काम पारदर्शी ठेवण्याचे काम केले आहे.
अॅवॉर्ड सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजक आणि प्रतिष्ठीतांना नवभारत बिझनेस एक्सीलेंस अॅवॉर्ड प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यापूर्वी परिवहनमंत्र्यांचे स्वागत नवभारतचे ग्रुप अध्यक्ष श्रीनिवास राव यांनी केले.