Pahalgam Terror Attack: पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजचे पोर्टल बंद, कारण काय? जाणून घ्या (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Share Market Marathi News: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. दोन दिवसांत तेथील शेअर बाजार २५०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला आहे. काल, गुरुवार २४ एप्रिल रोजी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (PSX) मध्ये मोठी घसरण दिसून आली. पीएसएक्समध्ये तीन दिवसांत जवळपास ४००० अंकांची घसरण झाली आहे. बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजार १२०० अंकांनी आणि गुरुवारी २५०० अंकांनी घसरला.
यानंतर, आज शुक्रवारी पाकिस्तानच्या शेअर बाजारात ४०० अंकांपर्यंत घसरण दिसून आली. पाकिस्तानच्या स्टॉक एक्सचेंजवर ट्रेडिंग सुरू आहे, परंतु हे पोर्टल भारतासाठी बंद करण्यात आले आहे दरम्यान, आज २५ एप्रिल रोजी पाकिस्तानी शेअर बाजाराची वेबसाइट क्रॅश झाली आहे. जेव्हा आम्ही त्यांची वेबसाइट उघडली तेव्हा एक संदेश दिसला ज्यामध्ये लिहिले होते, “We’ll be back soon.”(आम्ही लवकरच परत येऊ).
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. ज्याचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावर दिसून येत आहे. आर्थिक संकटातून जात असताना पाकिस्तानचा शेअर बाजार वाईट स्थितीत आहे. काल, केएसई १०० (कराची स्टॉक एक्सचेंज) उघडल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांत २.१२% किंवा २,४८५.८५ अंकांनी घसरून ११४,७४०.२९ वर पोहोचला.
भारताकडून वाढत्या तणावामुळे आणि आयएमएफने आर्थिक वर्ष २०२५ च्या जीडीपी वाढीचा अंदाज ३% वरून २.६% पर्यंत कमी केल्यामुळे ही घसरण दिसून येत आहे.
आयएमएफने पाकिस्तानचा विकास दर २.६% पर्यंत कमी करणे, कमकुवत रुपया, राजकीय अनिश्चितता आणि काश्मीरमधील तणाव यामुळे धोका आणखी वाढला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
तुम्हाला सांगतो की अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आर्थिक जोखीम आणि सतत बाह्य असुरक्षिततेचा हवाला देत आर्थिक वर्ष २५ साठी पाकिस्तानच्या GDP वाढीचा अंदाज २.६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) पाकिस्तानचा २०२५ चा GDP वाढीचा अंदाज डिसेंबर २०२४ मध्ये ३ टक्क्यांवरून २.५ टक्के केला आहे. दोन्ही अंदाज पाकिस्तान सरकारने या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेल्या ३.६ टक्के वाढीच्या लक्ष्यापेक्षा कमी आहेत.
गुरुवारी व्यवहाराच्या पहिल्या पाच मिनिटांत कराची-१०० निर्देशांक (केएसई-१००) दोन टक्क्यांनी किंवा २,५०० अंकांपेक्षा जास्त घसरून १,१४,७४०.२९ वर पोहोचला. दुपारी ३ वाजेपर्यंत निर्देशांकाने काही तोटा भरून काढला असला तरी, तो १,५३२.४२ अंकांनी किंवा १.३१ टक्क्यांनी घसरून ११५,६९३.७२ वर व्यवहार करत होता. शुक्रवारी व्यवहारादरम्यान कराची १०० ४०० अंकांनी घसरून ११४,७९६.३१ वर पोहोचला.