FTA च्या लाभाबाबत पियुष गोयल यांचा खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या FTA कराराची जोरदार चर्चा रंगली आहे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी सांगितले की, ब्रिटनसोबतच्या व्यापार करारात भारतीय हितसंबंधांशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. यामुळे भारताला प्रचंड फायदा होईल. ब्रिटिश बाजारपेठेतील संभाव्य संधींचा फायदा घेण्यासाठी मैदान तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
पाच वर्षांच्या एफटीए अंमलबजावणीनंतर, दोन्ही देश कराराचा आढावा घेतील. गोयल म्हणाले की, करारात दोन्ही देशांनी त्यांच्या संवेदनशील उत्पादनांना व्यापारापासून दूर ठेवले आहे. भारत ब्रिटनमधून येणाऱ्या कार आणि दारू या दोन्हींवरील शुल्क टप्प्याटप्प्याने कमी करेल आणि त्यांची आयात देखील मर्यादित केली जाईल. यामुळे आमच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही (फोटो सौजन्य – Instagram)
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढतेय
यावेळी गोयल म्हणाले की, आता प्रत्येक विकसित देश भारतातील आपल्या व्यवसाय भविष्याकडे पाहत आहे. भारतीय अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढत आहे. भारतात मध्यमवर्ग खूप वेगाने उदयास येत आहे. भारत एक विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार म्हणून उदयास येत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत हा एक लोकशाही देश आहे जिथे कायद्याचे राज्य आहे.
कराराच्या वेळी ब्रिटिश पंतप्रधानांनी म्हटले होते की भारतासोबतचा व्यापार करार आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. वाणिज्यमंत्र्यांनी सांगितले की अमेरिका, युरोपियन युनियन (EU), ओमान, न्यूझीलंड सारख्या देशांसोबत व्यापार करारावर चर्चा खूप प्रगती झाली आहे. पेरू, चिली सारख्या देशांसोबतही व्यापार चर्चा सुरू आहेत.
UPA सरकारने चर्चा अर्ध्यावरच सोडली
गोयल म्हणाले की, ब्रिटनसोबत व्यापार करारावरील चर्चा UPA सरकारमध्येच सुरू झाली होती, परंतु त्यांच्या सरकारने ती अर्ध्यावरच सोडली. २०२२ मध्ये मोदी सरकारमध्ये यावर चर्चा सुरू झाली आणि आम्ही ती एका निष्कर्षापर्यंत पोहोचवली, ज्यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा फायदा होईल.
ते म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात आसियान आणि इतर देशांसोबत व्यापार करार झाले होते, पण भारताला त्यांचा कोणताही फायदा मिळाला नाही. त्या देशांनी भारतीय वस्तूंसाठी त्यांचे दरवाजे फारच कमी उघडले, तर आम्ही त्यांच्यासाठी आमचे दरवाजे पूर्णपणे उघडले. याचा भारताला नक्कीच फायदा होणार असून व्यापार अधिक वाढणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे. तर FTA चा अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम होऊ शकतो. सध्या सगळीकडे या उचलेलेल्या महत्त्वाच्या पावलाबाबत चर्चा सुरू आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेत याचा मोठा हातभार लागणार असल्याचेही म्हटले जात आहे.
ब्रिटिश कंपन्यांना भारतात उत्पादन करण्याची मोठी संधी, ४०,००० सरकारी निविदांमध्ये होऊ शकतात सहभागी