पंतप्रधान मोदींकडून सफ्रान एअरक्राफ्ट सेवा केंद्राचे उद्घाटन (फोटो-सोशल मीडिया)
PM Narendra Modi News: बुधवारी हैदराबादमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्याधुनिक सुविधेच्या सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सेवा केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. ज्यामुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र बनेल. या प्रकल्पासाठी तब्बल १,३०० कोटी गुंतवणुक करण्यात आली असून यामुळे १,००० रोजगार निर्माण होणार आहेत. भारत LEAP इंजिनसाठी सर्वात मोठे मेंटेनन्स हब बनणार आहे.
भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा असून यामुळे भारतीय विमान क्षेत्रात मोठी सुधारणा होणार आहे. ही नवीन एमआरओ म्हणजेच देखभाल आणि दुरुस्ती सुविधा भारताला विमान देखभालीसाठी जागतिक केंद्रात वेगळेचं स्थान देईल. विमान वाहतूक क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला या उपक्रमामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सेवा केंद्राचे उद्घाटन केले. भारतात एखाद्या विमान इंजिन उत्पादकाने एवढी मोठी एमआरओ सुविधा प्रस्थापित करण्याची तशी पहिलीच वेळ आहे. ज्यामुळे भारताच्या विमान वाहतूक उद्योगात महत्वाचे पाऊल मानले जात आहे.
LEAP इंजिनसाठी सर्वात मोठे मेंटेनन्स हब
सफ्रानची ही सुविधा समर्पित एमआरओ सेंटर असून विशेषतः LEAP इंजिनसाठी आहे. जे एअरबस A320NEO आणि बोईंग 737 MAX सारख्या लोकप्रिय व्यावसायिक विमानांना वीज पुरवते. जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क (SEZ) मध्ये ही SAESI सुविधा सुमारे 45,000 चौरस मीटर एवढ्या विस्तृत क्षेत्रात पसरलेली आहे. सुरुवातीच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प अंदाजे ₹1,300 कोटी रुपयांपर्यंत बांधला गेला. वर्ष 2035 पर्यंत ही सेवा पूर्णपणे कार्यरत झाल्यावर, दरवर्षी 300 LEAP इंजिनांसाठी ही सुविधा सक्षम होईल. ही क्षमता भारताला जगातील सर्वात मोठ्या एमआरओ हबपैकी एक म्हणून स्थापित करण्यास मदत करेल.
रोजगार निर्मिती आणि स्वदेशीकरण
या प्रकल्पामुळे 1,000 हून अधिक अत्यंत कुशल भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञांना थेट रोजगार मिळणार आहे. या अत्याधुनिक केंद्र नवीन एमआरओ सेंटर विमान देखभालीसाठी भारत स्वदेशी गोष्टींना प्राधान्य देईल. ज्यामुळे परकीय प्रवाह कमी होईल. ज्यामुळे भारतीय चलनाला चालना मिळेल. तसेच, देशांतर्गत विमान वाहतूक पुरवठा अधिक मजबूत होऊन उच्च-मूल्य असलेल्या नोकऱ्या निर्माण होतील. हा निर्णय संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक दोन्ही क्षेत्रांसाठी स्वदेशी क्षमतांना बळकटी देईल.
विमान वाहतूक क्षेत्राच्या जलद वाढीसाठी भारत सरकार मजबूत एमआरओ इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. अलिकडच्या काही धोरणात्मक उपक्रमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून सफ्रानसारख्या जागतिक कंपन्यांना येथे गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाले आहे.






