RBI(फोटो सौजन्य- PINTEREST)
भारतातली सगळ्यात मोठी बँक एचडीएफसीवर रिजर्वे बँक ऑफ इंडियाने भारी भारकाम जुर्माना लावला आहे. RBI ने बँकवर ७५ लाखांचा दंड ठोठावला आहे. आता प्रश्न उपस्थित होतो की बँक ने कोणती चूक केली आहे इतका मोठा दंड आकारण्यात आला आहे.
प्रायव्हेट सेक्टरच्या सगळ्यात मोठ्या बँकवर कारवाई करण्यात आली आहे. देशाच्या सगळ्यात मोठी बँक एचडीएफसीवर रिजर्व बँक ऑफ इंडियाने मोठा दंड आकारण्यात आला आहे. रिजर्वे बँक ऑफ इंडियाने ७५ लोकांची पेनल्टी लावण्यात आली. आता प्रश्न असा उपस्थित होतो की अशी कोणती चूक बँकेने केली की ज्यामुळे मोठा दंड आकारण्यात आला आहे.
फक्त एचडीएफसीवर नाही तर…
आरबीआयने केवळ एचडीएफसी बँकवर नाही तर पंजाब अँड सिंध बँकवर देखील मोठा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बुधवारी आरबीआयने दंड ठोठावला आहे. आरबीआयने एचडीएफसी बँकेला ७५ लाख रुपये आणि पंजाब अँड सिंध बँकेला ६८.२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ठोठावण्यात आला दंड?
एचडीएफसी बँक कडून केवाईसी ( Know Your Customer) ची गाईडलाईन्सचा योग्य पालन करण्यात आले नाही. केवाईसी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे एचडीएफसी बँकेवर हा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकिंग मार्गदर्शक तत्त्वांवर लक्ष ठेवणाऱ्या आरबीआयला दंड आकारण्याचा अधिकार आहे.
एचडीएफसी व्यतिरिक्त, पंजाब अँड सिंध बँकेलाही ६८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बचत खात्याच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि सेंट्रलाइज्ड रिपॉझिटरीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
खातेधारकांवर काय परिणाम होणार?
बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड बँक कडून कंप्लायंस च्या कमीमुळे लावण्यात आला आहे. या दंडाचा बँक ग्राहकांमधील संबंदांशी काहीही संबंध नसेल. हा दंड बँक आणि आरबीआय यांच्यातील मुद्दा आहे. या दंडाचा ग्राहकांच्या व्यवहारांवर, कर्जांवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच, जर तुमचे खाते एचडीएफसी बँक किंवा पंजाब अँड सिंध बँकेमध्ये असेल तर रिझर्व्ह बँकेने लादलेल्या या दंडाचा बँक खातेधारकांवर कोणताही परिणाम होणार नाही.