रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांना मिळणार नफा
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने कंपनीच्या बोनस इक्विटी शेअर्ससाठी पात्र असलेल्या कंपनीचे इक्विटी भागधारक निश्चित करण्याच्या उद्देशाने 28 ऑक्टोबर 2024 (सोमवार) ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळाने गेल्या महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यासाठी मान्यता दिली होती. याचा अर्थ प्रत्येक भागधारक ज्याने रेकॉर्ड तारखेला प्रत्येकी रू. 10 चा 1 (एक) पूर्ण पेड-अप इक्विटी शेअर घेतला असेल तर त्यांना प्रत्येकी 10 रूपयांचा 1 संपूर्ण भरणा केलेला समभाग प्राप्त होणार आहे. (फोटो सौजन्य – iStock)
बोनस रेकॉर्ड डेट
“हे आमच्या 5 सप्टेंबर, 2024 आणि 16 ऑक्टोबर 2024 च्या लेटर्समध्ये नमूद केले आहे, ज्यामध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी सदस्यांनी मंजुरी दिली आहे. या संदर्भात, आम्ही कळवू इच्छितो की कंपनीने सोमवारचा दिवस निश्चित केला आहे. कंपनीच्या बोनस इक्विटी शेअर्ससाठी पात्र असलेल्या कंपनीचे इक्विटी भागधारक निश्चित करण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड तारीख म्हणून 28 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली आहे, ” असे RIL ने BSE फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
सर्वात मोठा जारी केलेला Issue
भारतीय इक्विटी मार्केटमधील बोनस इक्विटी शेअर्सचे आतापर्यंतचे हे सर्वात मोठे इश्यू असेल. बोनस शेअर्स जारी करणे आणि त्याची यादी करणे भारतातील आगामी सणासुदीच्या हंगामात होईल आणि आमच्या सर्व प्रतिष्ठित भागधारकांना दिवाळीची लवकर भेट असेल,” RIL ने आपल्या एजीएममध्ये म्हटले होते. तर, RIL कडून IPO नंतरचा हा सहावा बोनस आहे आणि या दशकातील दुसरा बोनस आहे, असेही सांगण्यात आले आहे.
कसा आहे रेशो
2017 मध्ये, रिलायन्सने 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी केले होते. यानंतर 2020 मध्ये राइट्स इश्यू आला, जिथे शेअरहोल्डरची गुंतवणूक आधीच 2.5 पट वाढली. जुलै 2023 मध्ये, Jio Financial Services Limited चे डिमर्जिंग झाले होते, ज्याचे मूल्य आज 35 टक्क्यांनी जास्त आहे. दिवाळीत रिलायन्सच्या भागधारकांना याचा अधिक फायदा मिळाल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा – श्रीराम एएमसीतर्फे 4 नोव्हेंबर 2024 ला श्रीराम लिक्विड फंडाचा शुभारंभ होणार!
बोनस शेअर म्हणजे काय?
बोनस शेअर म्हणजे एक्स्ट्रा शेअर ज्याचे कोणतेही मूल्य भागधारकांना आकारण्यात येत नाही. भागधारकांकडे कंपनीचे किती शेअर आहेत, त्याच्या आकड्यावर बोनस शेअर अवलंबून असतात. हे शेअर्स एका ठराविक रेशोमध्ये देण्यात येतात, 1:1 रेशोचा अर्थ एका शेअरवर एक अधिक शेअर. एखाद्या कंपनीने हा रेशो घोषित केला याचा अर्थ 100 शेअर्सवर 100 शेअर्स भागधारकांना मिळणार, म्हणजेच भागधारकांकडे 200 शेअर्सची संख्या होणार.