• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Swastika Controversy Us Coast Guard Hitler History Vs Hindu Religion

Swastika Controversy: ‘देवालाही मान्य नसलेली क्रूरता!’ हिटलरने चोरले होते हिंदूंचे पवित्र चिन्ह? वाचा याची उत्कंठावर्धक सत्यकथा

आजकाल, जर कोणी पाश्चात्य देशांमध्ये स्वस्तिकसारखे चिन्ह काढले तर ते लगेच नाझी चिन्ह मानले जाते. याचे कारण इतिहास आहे. २० व्या शतकात, अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाने हे चिन्ह त्यांचे चिन्ह म्हणून स्वीकारले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 26, 2026 | 11:50 AM
swastika controversy us coast guard hitler history vs hindu religion

'स्वस्तिक'वरून अमेरिकन तटरक्षक दलात वाद; जाणून घ्या का बनवले हिटलरने ते आपल्या ध्वजाचे प्रतीक? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तटरक्षक दलात खळबळ
  • चिन्हाचा विरोधाभास
  • हिटलरची मोठी चूक

Swastika controversy US Coast Guard Cape May : एका छोट्याशा चिन्हामुळे संपूर्ण अमेरिकन (America) लष्करी यंत्रणा हादरून जाईल, असे कोणालाही वाटले नव्हते. न्यू जर्सीमधील केप मे येथील ‘यूएस कोस्ट गार्ड’ प्रशिक्षण केंद्रात एका बाथरूमच्या भिंतीवर स्वस्तिकसारखे चिन्ह आढळले आणि एकच खळबळ उडाली. ही घटना केवळ एका चिन्हापुरती मर्यादित राहिली नाही, तर तिने इतिहास, धर्म आणि वंशद्वेषाच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. अमेरिकेसाठी हे चिन्ह ‘हिटलरच्या’ (Hitler) क्रूरतेची आठवण करून देणारे आहे, तर भारतीयांसाठी ते ‘कल्याणाचे’ प्रतीक आहे.

नेमकी घटना काय? अमेरिकेत एवढा गोंधळ का?

तटरक्षक दलाच्या एका प्रशिक्षकाने बाथरूमच्या भिंतीवर नाझी चिन्हासारखा आकार पाहिला आणि तत्काळ वरिष्ठांना कळवले. प्रकरण इतके गंभीर बनले की, तटरक्षक दलाच्या तपास सेवेने (CGIS) ९०० प्रशिक्षणार्थी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “आमच्या संस्थेत द्वेष आणि अतिरेकी विचारांना जागा नाही.” पाश्चात्य देशांमध्ये स्वस्तिक (ज्याला तिथे ‘हॅकेनक्रूझ’ म्हणतात) हे चिन्ह पाहणे म्हणजे ज्यू लोकांवरील अत्याचार आणि दुसऱ्या महायुद्धाच्या भयानक आठवणींना उजाळा देण्यासारखे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

हिटलरने स्वस्तिक का निवडले? एक ऐतिहासिक गैरसमज!

अनेक लोकांना प्रश्न पडतो की, जर्मनीच्या हिटलरने भारतीय चिन्ह का निवडले? १९ व्या शतकात युरोपात ‘आर्य वंश’ श्रेष्ठ असल्याचा एक खोटा सिद्धांत लोकप्रिय झाला होता. हिटलरला स्वतःला ‘शुद्ध आर्य’ म्हणवून घ्यायचे होते. संस्कृतमध्ये ‘आर्य’ शब्दाचा अर्थ ‘उदात्त आचरणाची व्यक्ती’ असा होतो, त्याचा वंशाशी संबंध नव्हता. मात्र, हिटलरने या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला आणि प्राचीन आर्य संस्कृतीचे प्रतीक म्हणून स्वस्तिकला आपल्या नाझी ध्वजावर स्थान दिले. १९२० मध्ये तयार झालेला हा ध्वज क्रूरता, हिंसा आणि वंशवादाचे प्रतीक बनला.

Hitler’s HakenKreutz is NOT the Hindu/Buddhist/Jain/Indo-European Swastika. Hindus are NOT anti-Semites. Asking Hindus to stop using the Swastika because of Hitler is like asking India to stop playing cricket because Aussie cricketers are racist cheats. In one word – absurd. pic.twitter.com/aj702I2oZb — Abhijit Chavda (@AbhijitChavda) July 24, 2020

credit – social media and Twitter

भारतीय स्वस्तिक: १५ हजार वर्षांचा गौरवशाली वारसा

हिटलरने हे चिन्ह वापरण्याच्या हजारो वर्षांपूर्वीपासून भारतात स्वस्तिक अत्यंत पवित्र मानले जाते. ‘स्वस्तिक’ हा शब्द ‘सु’ (चांगले) आणि ‘अस्ति’ (असणे) यांपासून बनला आहे, ज्याचा अर्थ ‘कल्याण’ असा होतो. हिंदू धर्मात ते सूर्य देव आणि गणपतीचे प्रतीक आहे. जैन धर्मात २४ तीर्थंकरांचे आणि बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या पावलांचे हे प्रतीक आहे. भारतात घराच्या उंबरठ्यावर किंवा पूजेच्या वेळी स्वस्तिक काढणे म्हणजे ईश्वरी ऊर्जा आणि सुख-समृद्धीला आमंत्रण देणे होय.

केवळ भारतच नाही, संपूर्ण जगात स्वस्तिकचे अस्तित्व

पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, स्वस्तिक हे जगातील सर्वात जुन्या चिन्हांपैकी एक आहे. सुमारे १५,००० वर्षांपूर्वीच्या अवशेषांमध्ये हे चिन्ह आढळले आहे. प्राचीन ग्रीस, रोम, चीन, जपान आणि अगदी अमेरिकेतील मूळ जमातींच्या (Native Americans) संस्कृतीतही हे चिन्ह विविध रूपात पाहायला मिळते. कोठे ते सूर्याचे चक्र मानले गेले, तर कोठे ते नशिबाचे प्रतीक. दुर्दैवाने, हिटलरच्या १२ वर्षांच्या राजवटीने या चिन्हाची हजारो वर्षांची सकारात्मक ओळख पाश्चात्य जगाच्या नजरेत पुसून टाकली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Canada Ties: ‘कॅनडातील हिंसक गुन्ह्यांमध्ये भारताचा…’ PM मार्क कार्नी यांनी दिल्ली भेटीपूर्वी दहशतवादावर केले ‘असे’ भाष्य

आजचा संघर्ष: चिन्ह एक, अर्थ दोन!

आजही पाश्चात्य देशात राहणाऱ्या हिंदूंना आपली संस्कृती जपताना अनेक अडचणी येतात. दारात काढलेले स्वस्तिक पाहून पाश्चात्य लोक त्याला नाझी चिन्ह समजून घाबरतात. हाच विरोधाभास अमेरिकन कोस्ट गार्डच्या घटनेत दिसून आला. शिक्षण आणि जागरूकता हाच यावरचा एकमेव उपाय आहे. स्वस्तिक हे द्वेषाचे नाही तर मानवतेच्या कल्याणाचे प्रतीक आहे, हे जगाला सांगण्याची वेळ आली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय स्वस्तिक आणि नाझी चिन्हात काय फरक आहे?

    Ans: भारतीय स्वस्तिक सहसा सरळ असते, त्यात चार ठिपके असतात आणि ते लाल किंवा पिवळ्या रंगात काढले जाते. नाझी चिन्ह (हॅकेनक्रूझ) ४५ अंशात झुकलेले (तिरेके) असते आणि ते काळ्या रंगात, पांढऱ्या वर्तुळात असते.

  • Que: स्वस्तिक शब्दाचा अर्थ काय होतो?

    Ans: 'स्वस्तिक' हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'कल्याण' किंवा 'शुभ होणे' असा होतो. हे सौभाग्य आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे.

  • Que: हिटलरने स्वस्तिकला 'आर्य' वंशाशी का जोडले?

    Ans: हिटलरला प्राचीन 'आर्य' हे जगातील सर्वात श्रेष्ठ वंश वाटत होते. त्याला वाटले की स्वस्तिक हे या श्रेष्ठ वंशाचे प्राचीन प्रतीक आहे, म्हणून त्याने आपल्या नाझी चळवळीसाठी ते निवडले.

Web Title: Swastika controversy us coast guard hitler history vs hindu religion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • America
  • General Knowledge
  • India History
  • World news

संबंधित बातम्या

धक्कादायक! अमेरिकेने हवाई दलाच्या माजी पायलटला ठोकल्या बेड्या; चिनी वैमानिकांना ‘कॉम्बॅट ट्रेनिंग’ दिल्याचा आरोप
1

धक्कादायक! अमेरिकेने हवाई दलाच्या माजी पायलटला ठोकल्या बेड्या; चिनी वैमानिकांना ‘कॉम्बॅट ट्रेनिंग’ दिल्याचा आरोप

ट्रम्प यांचा एक निर्णय अन् ब्रिटन सरकारने टेकले गुडघे; चागोस डीलवरुन घेतली माघार, नेमकं प्रकरण काय?
2

ट्रम्प यांचा एक निर्णय अन् ब्रिटन सरकारने टेकले गुडघे; चागोस डीलवरुन घेतली माघार, नेमकं प्रकरण काय?

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान
3

PM Modi Israel Visit : पंतप्रधान मोदींचा जगात डंका! इस्रायल अन् पॅलेस्टाईनकडून मिळाला सर्वोच्च बहुमान

PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र
4

PM Modi Israel Visit: ‘आम्ही फक्त तुमचे आहोत!’ इस्रायलने जगाला नाकारलं; पण भारताला दिलं ‘हे’ अपराजेय महाविनाशक शस्त्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Swastika Controversy: ‘देवालाही मान्य नसलेली क्रूरता!’ हिटलरने चोरले होते हिंदूंचे पवित्र चिन्ह? वाचा याची उत्कंठावर्धक सत्यकथा

Swastika Controversy: ‘देवालाही मान्य नसलेली क्रूरता!’ हिटलरने चोरले होते हिंदूंचे पवित्र चिन्ह? वाचा याची उत्कंठावर्धक सत्यकथा

Feb 26, 2026 | 11:50 AM
वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

Feb 26, 2026 | 11:48 AM
Top Marathi News today Live : DCM एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीचा विमानप्रवास करणार नाहीत

LIVE
Top Marathi News today Live : DCM एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीचा विमानप्रवास करणार नाहीत

Feb 26, 2026 | 11:48 AM
IND vs ZIM :  सलामीत बदल अपेक्षित, संजू सॅमसनला मिळू शकते संधी; वॉशिंग्टनच्या जागी अक्सरला मिळणार जागा

IND vs ZIM : सलामीत बदल अपेक्षित, संजू सॅमसनला मिळू शकते संधी; वॉशिंग्टनच्या जागी अक्सरला मिळणार जागा

Feb 26, 2026 | 11:47 AM
Anil Ambani Case: अनिल अंबानींना मोठा धक्का! ED ने जप्त केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे घर

Anil Ambani Case: अनिल अंबानींना मोठा धक्का! ED ने जप्त केले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे घर

Feb 26, 2026 | 11:44 AM
दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

Feb 26, 2026 | 11:40 AM
PM Modi Instagram Follower : सोशल मीडिया किंग! पंतप्रधान मोदी ठरले 10 कोटी फॉलोवर्स असणारे जगातील एकमेव नेते

PM Modi Instagram Follower : सोशल मीडिया किंग! पंतप्रधान मोदी ठरले 10 कोटी फॉलोवर्स असणारे जगातील एकमेव नेते

Feb 26, 2026 | 11:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.