Share Market Today: शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात; रिलायन्सपासून BHEL पर्यंत 'या' स्टॉक्सवर तज्ज्ञांचा भर
Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा घेतली झेप! 24 कॅरेट सोन्याची किंमत ऐकून चकित व्हाल
गुरुवारी भारतीय शेअर बाजार सपाट पातळीवर बंद झाला, तर बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीच्या वर टिकून होता. सेन्सेक्स १.४४ अंकांनी वाढून ७७,१८६.८७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ५.७५ अंकांनी, म्हणजेच ०.०२ टक्क्यांनी घसरून २४,०७२.७५ अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य – AI Created)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या वेल्थ मॅनेजमेंट, डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया यांनी आज गुंतवणूतकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. तापारिया यांनी सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज , भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) आणि डिक्सन टेक्नॉलॉजीज (इंडिया) चे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल, रामकृष्ण फोर्जिंग्स आणि आयईएक्स या तीन स्टॉक्सची निवड केली आहे.
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल या शेअर बाजारातील तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये बायोकॉन लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), युनियन बँक ऑफ इंडिया , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), वरुण बेवरेजेस लिमिटेड, ग्राफाइट इंडिया लिमिटेड, आर. आर. केबल लिमिटेड आणि रेन इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, विप्रो, टेक महिंद्रा, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, एचसीएल टेक, पीसी ज्वेलर्स, पिरामल फायनान्स, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, CEAT या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी टॅनला प्लॅटफॉर्म्स, इंडिया निप्पॉन इलेक्ट्रिकल्स, ॲपकोटेक्स इंडस्ट्रीज, इन्फो एज (इंडिया) आणि व्हीनस पाईप्स अँड ट्यूब्स या शेअर्सची शिफारस केली आहे.






