फोटो सौजन्य: Social Media
कधीही न झोपणाऱ्या, गजबजलेल्या मुंबई शहरात स्विगी इन्स्टामार्ट हा मध्यरात्रीच्या क्रेव्हिंग्स, शेवटच्या क्षणाच्या अत्यावश्यक वस्तू आणि पावसाळ्यात आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी मागणीवरचा बेस्ट प्लॅटफॉर्म ठरला आहे. “भारताने २०२४ मध्ये स्विगीचा कसा वापर केला- स्विगी इन्स्टामार्ट व्हर्जन” या अहवालात या वर्षी कशाप्रकारे व्यवहार केला हे दिसून आले आहे. त्यात शहराची खास लय आणि ग्राहकांच्या वर्तनाचे प्रतिबिंब दर्शवणारे खरेदीचे वेगळे ट्रेंड्स पाहता येतात.
या अहवालाबाबत बोलताना स्विगी इन्स्टामार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितेश झा म्हणाले की, “सप्टेंबर २०२१ मध्ये सुरूवात केल्यापासून मुंबई शहराला वेगवान व्यवहाराची सोय खूप आवडल्याचे दिसून आले आहे. रोजच्या अत्यावश्यक गोष्टी, खेळणी, मेक अप किट्स आणि सणांसाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे दहा मिनिटांत उपलब्ध होतात. शहरातील मोठ्या खरेदींमध्ये दूध, कांदा, दही, बटाटा आणि अंडी यांचा समावेश असून शहरातील एका वापरकर्त्याने फक्त पशुखाद्यावर तब्बल 15 लाखांपेक्षा जास्त खर्च केला आहे. आम्हाला या प्रवासाचा भाग होताना, सुलभता रोजच्या आयुष्याचा भाग बनवताना आणि आमच्या ग्राहकांना हव्या असलेल्या गोष्टी हव्या त्या वेळी उपलब्ध करून देताना खूप अभिमान वाटतो.”
निरोगी ग्राहक वित्त बाजाराचे संवर्धनासाठी सहयोगी दृष्टीकोण महत्त्वाचा, आशीष तिवारी यांचे मत
पावसाळ्यातल्या अत्यावश्यक गोष्टी: पावसाळ्यातल्या अत्यावश्यक गोष्टी ऑर्डर करण्यात मुंबईने देशाचे नेतृत्व केले. या वेळी 20000 छत्र्या आणि रेनकोट खरेदी केले गेले असून पावसाळ्यासाठी मुंबई सज्ज झाली.
पावसाळ्याचे दिवस आणि आइस्क्रीम: मुंबईने आइस्क्रीमच्या बॉक्सेसवर ४१ लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. पाऊस आणि आइस्क्रीम ही एक उत्तम जोडी आहे बहुदा!
प्राण्यांचे लाड: शहरातल्या एका प्राणीप्रेमी व्यक्तीने पशुखाद्यावर तब्बल १५,००,००० रूपये खर्च केले आणि आपल्या प्राण्यांना चांगले खाणे आणि काळजी मिळेल यासाठी प्रयत्न केले.
मॅगी मॅनिया: मुंबईने 2024 मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर मॅगीची पाकिटे ऑर्डर केली. यावर 32 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली.
मुंबईने खऱ्या अर्थाने आपली “मॅक्सिमम सिटी” प्रतिमा जपली आहे. मुंबईकरांनी एकाच दिवशी टॉनिक वॉटरवर तब्बल ८ लाख रूपये खर्च केले.
तंत्रज्ञान स्वीकारातील अंतर भरून काढणे : यशस्वी डिजिटल परिवर्तनासाठीचे 4 टप्पे – एस. वेंकट
पण हे फक्त खाण्याबद्दल नाहीये. मुंबईकर खूप प्रॅक्टिकल आहेत. त्यांनी १२ कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम इलेक्ट्रॉनिक्सवर खर्च केली आणि त्यामुळे या श्रेणीत बंगळुरू आणि दिल्लीनंतर तिसरा क्रमांक पटकावला. गॅजेट्सपासून ते पोकर चिप्सपर्यंत मुंबईकर प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहेत.
स्विगी इन्स्टामार्टची स्थापना ऑगस्ट २०२० मध्ये झाली असून तो भारताचा आघाडीचा क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. सध्या 54 शहरांमध्ये असलेल्या स्विगी इन्स्टामार्टकडून भारतीयांच्या घरात अवघ्या १०-१५ मिनिटांत किराणा माल आणि इतर रोजच्या अत्यावश्यक गोष्टी पोहोचवण्यासाठी स्विगीच्या उत्तम तंत्रज्ञानाचा आणि कटिबद्ध डिलिव्हरी पार्टनर्सचा वापर केला जातो.