फोटो सौजन्य- सोशल मीडिया
स्वयंसेवा दयाळूपणाचे कृत्य असण्यासोबत सहानुभूती व काळजी घेण्याचे प्रबळ माध्यम आहे, जे व्यक्ती आणि समुदायांच्या जीवनात बदल घडवून आणते. यूएनद्वारे ५ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवा दिन परिवर्तनाला चालना देण्यामध्ये स्वयंसेवक बजावणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिकेला प्रशंसित करतो.
टाटा मोटर्स येथील सीएसआरचे प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, “लहान, पण अर्थपूर्ण पुढाकारांसह स्वयंसेवेची सुरूवात होते, जे दीर्घकालीन बदल घडवून आणतात.” आपल्या सामाजिक प्रभाव उपक्रमांच्या माध्यमातून कंपनीने स्वयंसेवेप्रती १.१७ लाख तास योगदान दिले आहे. खाली चार मार्ग देण्यात आले आहेत, जे तुम्हाला अनेक स्वयंसेवक व चेंजमेकर्सकडून प्रेरित होण्यास साह्य करू शकतात, ज्यांनी त्यांच्या दैनंदिन कृतीमध्ये दयाळूपणाचा समावेश केला आहे.
4 प्रमुख मार्ग
1. आरोग्य व स्वास्थ वाढवा, एका वेळी एक पाऊल: मुलभूत आरोग्यसेवा हा मुलभूत अधिकार आहे, पण अनेक समुदायांना आजही या आवश्यक संसाधनांसाठी पाठिंब्याची गरज आहे. यासंदर्भात गती देण्यासाठी जीवन वाचवणाऱ्या रक्तदान मोहिमा सारख्या सामुदायिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्या आणि अर्थपूर्ण प्रभाव घडवून आणा. तुमचे योगदान आरोग्यदायी आणि अधिक सर्वसमावेशक समुदायांसाठी मार्ग सुकर करू शकते.
2. सामुदायिक सेवांप्रती योगदान द्या: वर्दळीच्या ठिकाणी दैनंदिन जीवनात सुधारणा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थापनात साह्य अशा नागरी उपक्रमांमध्ये सहभाग घेत बदल घडवून आणा. अर्थपूर्ण कार्याप्रती समर्पित, तसेच जागरूकता निर्माण करणाऱ्या आणि प्रभावी सोल्यूशन्सना चालना देणाऱ्या वॉकेथॉन्स किंवा सायक्लेथॉन्समध्ये सामील व्हा. या प्रयत्नांप्रती लहान योगदान देखील सहयोगात्मक कृतीला प्रेरित करू शकते आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणू शकते.
3. जनजागृती करा, प्रेरित करा आणि बदल घडवून आणा: शिक्षण व कौशल्य-निर्मिती समुदायांमध्ये दीर्घकालीन प्रभाव निर्माण करतात. ट्यूटर म्हणून स्वयंसेवक बना किंवा तरूण प्रौढ व्यक्तींना रोजगार-संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या उपक्रमांमध्ये सामील व्हा किंवा शालेय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या मोहिमांप्रती योगदान द्या. हे प्रयत्न अध्ययन व कौशल्यांमधील तफावत दूर करण्यास मदत करतात, ज्यामुळे व्यक्ती शाश्वत उदरनिर्वाह निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम होतात.
4. सहयोगाने आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करा: आपल्या पर्यावरणाचे संरक्षण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सामुदायिक स्वच्छता, समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमा किंवा वृक्षारोपण उपक्रमांमध्ये सहभाग घ्या. यांसारख्या साध्या कृती आरोग्यदायी पर्यावरणाला चालना देतात आणि इतरांना दीर्घकालीन पर्यावरणीय परिवर्तनासाठी अभियानामध्ये सामील होण्यास प्रेरित करतात. २०२३-२४ मध्ये टाटा मोटर्सने वृक्षाच्छादित भागांची वाढ करण्यासोबत कार्बनचे प्रमाण कमी करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेचा भाग म्हणून भारतभरात १,१३७,०८९ रोपांची लागवड केली.
यंदा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवा दिनानिमित्त, आपण सर्वांनी विश्व निर्माण करण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ करूया, जेथे स्वयंसेवा प्रासंगिक नसून जीवनाचा मार्ग असेल. या प्रभावामध्ये वैविध्यतता आणण्यासाठी कॉर्पोरेट व कर्मचारी स्वयंसेवक या मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. स्वयंसेवेमुळे समाजाला फायदा होतो, तसेच व्यक्तींमध्ये टीमवर्क व नैतिकतेची भावना जागृत होते. म्हणून, आपण स्वयंसेवेला आपल्या कॉर्पोरेट संस्कृती व दैनंदिन जीवनाचा आधारस्तंभ बनवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.