टेलिमार्केटिंग कंपन्यांवर ट्रायचा हातोडा, इतक्या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत; मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा!टेलिमार्केटिंग कंपन्यांवर ट्रायचा हातोडा, इतक्या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत; मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा!
तुम्हीही तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे त्रस्त आहात का? आपल्यापैकी बरेच जण या समस्येमुळे त्रस्त असाल. विषेश म्हणजे काही नागरिकांची तर अशी तक्रार असते की, या स्पॅम कॉल्स आणि मेसेजमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मात्र, आता अशा कंपन्यांनविरोधात टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) कारवाईचा हातोडा उगारला आहे. ट्रायने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या सुमारे ५० टेलिमार्केटिंग कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
५० टेलिमार्केटिंग कंपन्या काळ्या यादीत
विशेष म्हणजे टेलिमार्केटिंग कंपन्यांनी देशातील मोबाईल फोन वापरकर्त्यांचे जगणे कठीण केले आहे. असे असतानाच काही कंपन्यांविरोधात ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी देखील ट्रायकडे दाखल झाल्या आहेत. दूरसंचार क्षेत्रातील नियामक ट्रायकडे टेलिमार्केटिंग कंपन्यांविरुद्ध विविध प्रकारच्या सुमारे 8 लाख तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दूरसंचार कंपन्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने सुमारे ५० टेलिमार्केटिंग कंपन्यांना ट्रायकडून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
काय म्हटलंय ट्रायने याबाबत?
टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात देशभरात स्पॅम कॉल्स आणि मेसेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून पर्यंत) नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांविरोधात 7.9 लाखांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ही समस्या गांभीर्याने घेत ट्रायने १३ ऑगस्ट २०२४ रोजी टेलिमार्केटिंग कंपन्यांना कठोर सूचना जारी केल्या होत्या. मात्र, काही दूरसंचार कंपन्यांनी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!
स्पॅम कॉल्स कमी होण्यास मदत होणार
टेलिकॉम कंपन्यांनी स्पॅम कॉल्स आणि मेसेजसाठी संसाधनांचा गैरवापर केल्याने, या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ट्रायने सुमारे 50 कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, 2.75 लाखांहून अधिक एसआयपी, डीआयडी, मोबाइल नंबर आणि दूरसंचार साधने देखील खंडित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांचे स्पॅम कॉल्स कमी होण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे आता देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.