Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diet Coke Price Hike: मिडल ईस्टच्या युद्धाचा डाएट कोकवरही परिणाम? भारतात दर वाढले, नेमकं दरामागील गणित काय?

सर्वसामान्य कोका-कोलाच्या तुलनेत 'डाएट कोक' किंवा 'झिरो-शुगर' पेयांची किंमत भारतात जास्त का असते? हा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो. डाएट कोकमध्ये साखर नसली तरीही भारतात त्यावर २८% जीएसटी आणि १२% अतिरिक्त सेस असा एकूण ४०% कर आकारला जातो. पण यामध्ये नवा मुद्दा आहे? नेमका काय?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 26, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मिडिल ईस्टच्या युद्धाचा डाएट कोकवर परिणाम?
  • भारतात दर वाढले
  • समजून घ्या दरामागील नेमकं गणित
Diet Coke Cost Increase : सध्या मिडल ईस्टमध्ये सुरु असलेला ताण आणखीन वाढत आहे. याचा परिणाम लहानात लहानापासून ते मोठ्यात मोठ्या क्षेत्रावर होत असलेला पाहायला मिळतो. आता भारतातच बघाना सर्वाधिक चर्चेत असलेला डाएट कोक महाग होणार आहे. पण नेमकं या मागचं कारण काय? आणि किमतीत नेमका किती फरक पडणार आहे? सविस्तर समजून घेऊयात.

India Forex Reserve: भारताचा परकीय चलनसाठा 1.08 अब्ज डॉलरने वाढला; पण सोन्याच्या साठ्यात का झाली घट? जाणून घ्या कारण

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे ॲल्युमिनियम कॅनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे कोका-कोलाला डायट कोकसाठी वेगळी पॅकेजिंग पद्धत निवडण्यास भाग पडले आहे. याचा परिणाम आता भारतातील त्याच्या किमतीवर होत आहे.

भारतात डायट कोकची किंमत १०% पेक्षा जास्त

जर तुम्ही अलीकडेच डायट कोक खरेदी केला असेल आणि जर तो तुम्हाला महाग वाटत असेल, तर यामागचं कारण फक्त महागाईमुळे नाही. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे ॲल्युमिनियम कॅनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम पॅकेजिंग बदलण्यापर्यंत झाला आहे. आणि ज्याचा खर्च नक्कीत खरेदीदारांच्या खिशातून घेतला जाणार आहे.
कोका-कोलाने भारतात डायट कोकची किंमत १०% पेक्षा जास्त वाढवली आहे. अहवालानुसार, पुरवठ्याच्या अडचणींमुळे, कंपनी आता आग्नेय आशियातून मोठे ॲल्युमिनियम कॅन मिळवत आहे. पण कंपनीने अद्याप या बदलाविषयी कोणताही तपशील अधिकृतरित्या दिलेला नाही किंवा जाहीर केलेला नाही.

ॲल्युमिनियम कॅनच्या तुटवडा  मुख्य कारण?

ॲल्युमिनियम कॅनच्या तुटवड्याचे मुख्य कारण म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी. जशी या मार्गावरुन होणारी जलवाहतुक बंद होते त्याचा प्रदीर्घ परिणाम उत्पादनावर होतो आणि त्यानंतर किमतींवर होतो. हा सागरी मार्ग भारताला ॲल्युमिनियम कॅन आणि संबंधित कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इराणच्या संकटानंतर, या मार्गावरील मालवाहतूक अवघड झाली आहे, ज्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होत आहे आणि कंपन्यांचा खर्च वाढत आहे.

तात्पुरते २०० मिलीच्या काचेच्या बाटल्यांमध्येही विक्री

भारतात डायट कोक प्रामुख्याने ॲल्युमिनियम कॅनमध्ये विकला जातो. पूर्वी ३०० मिलीचा कॅन ₹४० ला मिळत होता, परंतु पुरवठ्याच्या समस्येनंतर कंपनीने ३३० मिलीचा कॅन ₹५० ला विकायला सुरुवात केली आहे. प्रति मिलीलीटर दरात १३.६% वाढ झाली आहे. पण कोका-कोलाने या बदलावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही भारतीय बॉटलर्सनी तात्पुरते २०० मिलीच्या काचेच्या बाटल्यांमध्येही डायट कोक विक्रीसाठी देण्यास सुरुवात केली आहे, पण मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची किंमत पूर्वीच्या कॅनपेक्षा जास्त झाल्या आहेत.

कोणावर कमी परिणाम?

भारतात डायट कोक प्रामुख्याने ॲल्युमिनियम कॅनमध्ये विकला जातो, त्यामुळे कॅनच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका त्याला बसला आहे. दरम्यान, कोक झिरो प्लास्टिकच्या बाटल्या आणि कॅन या दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. कोका-कोला आणि पेप्सीची इतर बहुतेक पेये देखील प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांमध्ये विकली जातात, त्यामुळे या संकटाचा त्यांच्यावर कमी परिणाम झाला आहे.

Dharmendra Pradhan तब्बल किती कोटींचे मालक? राजीनाम्यानंतर आता Networth चर्चेत, जाणून घ्या बँकांमध्ये किती शिल्लक?

Web Title: Why diet coke is expensive in india reasons explained marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Business News
  • Diet Plan
  • Inflation
  • Iran Israel Conflict
  • Marathi News
  • Price Hike
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!
1

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
2

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
3

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड
4

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.