Greenland Dispute : 'ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नाही' ; टॅरिफ धमकीवर डेन्मार्कचा ट्रम्पला स्पष्ट इशारा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धमकीवर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी युरोपला ब्लॅकमेल करणे सोपे नाही असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांच्या कोणत्याही दबावाला डेन्मार्क आणि इतर युरोपीय देश बळी पडणार नाही असेही फ्रेडरिकसेन यांनी स्पष्ट केले आहे.त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की, ग्रीनलँडच्या भविष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ तेथील नागरिकांना आणि डॅनिश लोकांना आहे. तसेच ग्रीनलँड हा डेन्मार्कच्या नियंत्रणाखालील स्वतंत्र देश असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी डेन्मार्कची आहे. यामुळे डेन्मार्क ग्रीनलँडचे सर्वोतोपरी रक्षण करेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीपासून ग्रीनलँड विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलँड गरजेचे असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. तसेच ट्रम्प यांच्या मते या आर्क्टिक प्रदेशात रशिया आणि चीनचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेला धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी ट्रम्प यांनी ग्रीनलँड हवे आहे. यामुळे यामध्ये अडथळा आणणाऱ्या देशांवर टॅरिफ लादले जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.
ग्रीनलँडवर अमेरिकेच्या नियंत्रणाला डेन्मार्क आणि इतर काही युरोपीय देशांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे नाटो संपुष्टात येऊ शकते असे युरोपीय देशांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर हल्ल्याच्या धमकीनंतर फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीने डेन्मार्कसह ग्रीनलँडमध्ये लष्करी तैनाती केली आहे. यामुळे ट्रम्प यांनी संतापून या देशांवर टॅरिफ लादले आहे. यामध्ये फ्रान्सह, डेन्मार्क, जर्मनी, यूके, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँडस आणि फिनलँड या देशांचा समावेश आहे.
याच वेळी दुसरीकडे ग्रीनलँडच्या नागरिकांनी देखील ट्रम्प यांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. ग्रीनलँड हे विक्रीसाठी नाही, ग्रीनलँड (Greenland) हे ग्रीनलँडच्या लोकांचेच आहे, अशा घोषणा देत हजारो लोक ट्रम्पविरोधात रस्त्यावर उतरले आहे.
Ans: ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीवर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी युरोप ट्रम्पच्या कोणत्याही दबावाला, ब्लॅकमेलिंगला बळी पडणार नसल्याचे म्हटले आहे,
Ans: ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली हवे आहे, परंतु युरोपीय देशांनी याला तीव्र विरोध केला असल्याने ट्रम्प यांनी त्या देशांवर टॅरिफ लादला आहे.
Ans: ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर १० टक्के टॅरिफ लागू केले आहे. परंतु ग्रीनलँडसोबत करार न झाल्यास ट्रम्प यांनी १ जून २०२६ पासून युरोपीय देशांवर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.






