फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरी मिळवण्याची संधी शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुळात, बँकिंग क्षेत्रात काम करू पाहणार्या उमेदवारांनी नक्कीच या भरतीचा आढावा घेण्यात यावा. एकूण 273 रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च निश्चित करण्यात आली आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स, एफएलसी काउंसलर्स आणि एफएलसी डायरेक्टर्सच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी लेख नक्की वाचा. चला तर मग जाणून घेऊयात, महत्वाचं निकषांबद्दल:
रिक्त जागांमध्ये २६३ एफएलसी काउंसलर्स पदांचा समावेश आहे. ६ FLC डायरेक्टर्स पदांचा समावेश आहे तर ४ रिटेल प्रोडक्ट्सच्या रिक्त जागांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवाराला किमान २८ वर्षे वय असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ४० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराला किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव हवाय. विविध पदांसाठी शिक्षण निकष वेगळेवेगळे आहेत.
उमेदवारांची नियुक्ती शॉर्टलिस्टिंगने होणार आहे. तसेच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. फायनल मेरिट लिस्ट मुलाखतीच्या आधारावर ठरवण्यात येईल. विविध पदांसाठी वेतनमाला वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. ₹१,०५,२८० इतके वेतन मॅनेजर रिटेल प्रोडक्ट्स पदासाठी देण्यात येणार आहे. एफएलसी काउंसलर्स पदासाठी ५०,००० वेतन देण्यात येईल. तर एफएलसी डायरेक्टर्स पदासाठी ७५,००० रुपये इतके वेतन देण्यात येईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज