फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यात भरतीच्या संधीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अग्नीवीर भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावे. १२ मार्चपासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवारांना १० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. परीक्षेच्या तारखा आद्यआप जाहीर करण्यात आल्या नाहीत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारणनी joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. संपूर्ण भारतभरात ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून सारखी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तर SC आणि ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही २५० रुपये भरावे लागणार आहे. PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २१ वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. विविध पदांसाठी निकष वेगेवेगळे आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार जनरल ड्युटी तसेच ट्रेंड्समनच्या पदासाठी अर्ज करू शकतात. बारावी उत्तीर्ण उमेदवार क्लार्क तसेच स्टोअर किपरच्या पदासाठी अर्ज करू शकतात. तर टेक्निकल पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे, त्याचबरोबर त्याचे PCM चे शिक्षण पूर्ण असावे.
या भरतीच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:
तसेच खालील टप्प्यांच्या माध्यमातून उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात: