फोटो सौजन्य - Social Media
काही दिवसांपूर्वी समग्र शिक्षा अभियान भरती २०२४ संबंधित अधिकृत अधिसूचनजा जाहीर करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेला रोजगाराच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जर तुम्ही रोजगाराच्या शोधामध्ये आहात आणि नव्या भरतीच्या संधीची प्रतीक्षा करता आहात, तर या भरती प्रक्रियेवर तुम्ही नक्कीच लक्ष टाकले पाहिजे. समग्र शिक्षा अभियानाने क्लर्कच्या पदासाठी या भरतीला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून महिला तसेच पुरुष उमेदवारांची भरती केली जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.
हे देखील वाचा : IIT JEE ऍडव्हान्समध्ये आला AIR १, मिळाला बेस्ट कॉलेज; १ वर्षांमध्ये सोडले IIT बॉंबे
समग्र शिक्षा अभियान भरती २०२४ या भरती प्रक्रियेला १६ ऑगस्ट २०२४ला सुरुवात झाली असून, इच्छुक असलेल्या उमेदवारांना २५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. मुदत संपण्याची कालावधी काही दिवसांवर आल्यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकर आपले अर्ज नोंदवण्याचे आवाहन सतत केले जात आहे.
समग्र शिक्षा अभियान भरती २०२४ या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्जशुल्क आकारले जाणार नाही आहे. एकंदरीत, उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी निश्चिंत होऊन अर्ज करावे. या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तींचे पालन करावे लागणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली गेली आहे. या अधिसूचनेमध्ये वय तसेच शिक्षण यासंदर्भात अटीशर्ती नमूद आहेत, ज्याला पात्र असणाऱ्या उमेदवाराला या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे.
वयोमर्यादेनुसार, अर्ज कर्त्या उमेदवाराचे किमान वय १८ असावे तर कमाल वय ३५ वर्षे इतके असावे. आरक्षित प्रवगातील उमेदवारांना काही गोष्टींमध्ये सूट देण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करू पाहणार्या उमेदवारांची दहावी तसेच बारावी यशस्वीरीत्या पूर्ण असावी. तसेच उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून पदवीधर असावा. या निवड प्रक्रियेमध्ये नियुक्ती मिळवण्यासाठी उमेदवारांना विविध टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे.
उमेदवारांना लिखित परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. यानंतर उमेदवारांची दस्तऐवज तपासणी करण्यात येईल आणि उमेदवाराला वैद्यकीय चाचणीही उत्तीर्ण करणे भाग आहे.