फोटो सौजन्य - Social Media
राज्याबाहेर नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी, बडोदा यांनी शिक्षक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. 15 एप्रिल 2025 रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, एकूण 819 शिक्षक पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी 15 एप्रिल 2025 पासून 30 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी पात्रता ही UGC, AICTE, PCI किंवा NCTC मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हतेनुसार निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचून पात्रतेची खात्री करूनच अर्ज करावा.
या भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, मुलाखत परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांतून केली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी msubaroda.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्रथम आपली पात्रता तपासावी, त्यानंतर अर्ज फॉर्म भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, अर्ज फी भरावी आणि शेवटी अर्जाची प्रिंट घ्यावी.
या भरतीसाठी अर्ज शुल्काचे विवरण पुढीलप्रमाणे आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 500 रुपये, तर SC, ST आणि PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये ठेवण्यात आले आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. सध्या परीक्षा दिनांक जाहीर करण्यात आलेला नसला तरी तो लवकरच अधिकृत वेबसाइटवर घोषित केला जाईल.
शिक्षक पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच साधावी. गुजरातमध्ये, विशेषतः बडोदा सारख्या शैक्षणिक शहरात काम करण्याची संधी ही उमेदवारांच्या करिअरसाठी एक मजबूत पायरी ठरू शकते. ही भरती शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे वेळ न दवडता, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेची माहिती घेऊन, अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. ही संधी केवळ नोकरीसाठी नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या संधीसाठीसुद्धा आहे.