फोटो सौजन्य - Social Media
इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचा IPO ३१ डिसेंबर २०२४ रोजी खुला झाला आहे. तसेच२ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. एकंदरीत, आज डाव लावण्याचा शेवटचा दिवस आहे. हा IPO ₹२०४ ते ₹२१५ च्या प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला आहे. ₹२६०.१५ कोटींच्या या पब्लिक इश्यूला पहिल्याच दोन दिवसांत गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. स्टॉक मार्केट निरीक्षकांच्या मते, इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेडचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ₹९६ च्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत, जो पहिल्या दिवशीच्या ₹८५ च्या प्रीमियमपेक्षा ₹११ ने जास्त आहे. ग्रे मार्केटमधील या सकारात्मकतेचे कारण म्हणजे उत्तम बाजार भावना आणि IPO च्या जोरदार सब्सक्रिप्शनचे आकडे.
इंडो फार्म इक्विपमेंट IPO सब्सक्रिप्शनविषयी जाणून घेऊयात. पुरवण्यात आलेलले आकडे, २ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२:३९ वाजेपर्यंतचे आकडे आहेत. एकंदरीत, एकूण सब्स्क्रिप्शन १११.२१ पटीने वाढले आहे. रिटेल गुंतवणूकदार ७३.१४ पटीने वाढले आहेत. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये (NII) ३०९.०० पटीने वाढ झाली आहे. क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्समध्ये (QIB) २९.५१ पट वाढ दिसण्यात आली आहे.
या IPO संबंधित अनेक तज्ञांनी आपली मते जाहीर केले आहेत. रिलायन्स सिक्युरिटीजने यावर आपले म्हणणे जाहीर केले आहेत. त्यांचे मत आहे की,“इंडो फार्मकडे मजबूत उत्पादन क्षमता, नवीन क्रेन विभागात विस्तार, आणि संशोधन व विकासासाठी उत्कृष्ट कौशल्य आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा IPO बहुगुणात्मक वाढीची संधी निर्माण करतो. आम्ही या इश्यूला ‘सब्सक्राइब’ करण्याची शिफारस करतो.” स्टॉक्सबॉक्स, बीपी इक्विटीज, कॅनरा बँक सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल सिक्युरिटीज, आणि वेंचुरा सिक्युरिटीज यांसारख्या तज्ज्ञ संस्थांनी देखील या IPO ला ‘सब्सक्राइब’ टॅग दिला आहे. ग्रे मार्केटमधील वाढता प्रीमियम आणि सब्सक्रिप्शनचे मजबूत आकडे लक्षात घेता, हा IPO गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरण्याची शक्यता आहे.
या IPO संबंधित आनंद राठी यांचे मत आहे कि, “परंपरागत व्यवसाय मूल्य, अनुभवी प्रवर्तक, आणि उत्पादन क्षमतेचा विस्तार यामुळे इंडो फार्म दीर्घकालीन चांगल्या संभाव्यता दर्शवते. आम्ही याला ‘लांब कालावधीसाठी सब्सक्राइब’ करण्याचा सल्ला देतो.”
इंडो फार्म IPO संबंधित महत्त्वाची माहिती:
इंडो फार्म IPO आज २ जानेवारी २०२५ रोजी बंद होणार आहे. तसेच ३ जानेवारी २०२५ रोजी या IPO चे अलॉटमेंट होण्याची संभाव्यता आहे. तसेच ७ जानेवारी २०२४ रोजी या IPO ला लिस्टिंग केले जाईल. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड ही भारतातील शेती व बांधकामासाठी लागणारे उपकरणे जसे ट्रॅक्टर, क्रेन्स, आणि डिझेल इंजिन यांचे उत्पादन करणारी एक महत्वाची कंपनी आहे. हिमाचल प्रदेशस्थित कंपनी संशोधन, नवकल्पना, आणि गुणवत्तेला प्राधान्य देत ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. IPO ला मिळालेल्या जोरदार प्रतिसादामुळे कंपनीच्या भक्कम आर्थिक कामगिरीचा व भविष्यातील विकासाच्या शक्यतांचा प्रत्यय येतो.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)