फोटो सौजन्य - Social Media
देशाच्या Income Tax विभागात भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीसाठी अनुभवी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. स्टेनोग्राफर ग्रेड १ च्या रिक्त पदांना भरण्यासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १०० रिक्त जागांना भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार ३१ मार्च २०२५ पर्यंत त्यांचे अर्ज नोंदवू शकता. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. तसेच भरण्यात आलेले अर्ज पुरवण्यात आलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असणे अनिवार्य आहे. हे पात्रता निकष उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. वयोमर्यादेसंदर्भात आहेत तसेच उमेदवारांच्या अनुभवासंदर्भात आहेत. मुळात, या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणारा उमेदवाराकडे किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यांच्या अनुभवानुसार वेतन त्यांना पुरवण्यात येईल. मुळात, या भरतीच्या माध्यमातून नियुक्तीसाठी पात्र होण्यास उमेदवारांची आयु ५६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली उमेदवार स्टेनोग्राफर पदी अनुभवी असणे अनिवार्य आहे.
Income tax विभागात काम करू पाहणाऱ्या उमेदवाराला जर या भरतीसाठी अर्ज करायचे असेल तर त्याने वरील सर्व निकष पात्र करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ३५,४०० रुपयांपासून १,१२,४०० रुपयांपर्यंतचे वेतन पुरवण्यात येईल. उमेदवाराचे वेतन हे त्याच्या कौशल्यावर तसेच अनुभवावर अवलंबून असते. मुळात, अर्ज ऑनलाईन भरायचा असला तरी भरलेला अर्जाचा फॉर्म एका ठराविक पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय आयकर विभागाच्या incometaxindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय आयकर विभागाच्या incometaxindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यामध्ये पुरवण्यात आलेल्या स्टेनोग्राफर ग्रेड I या लिंकवर क्लिक करा. स्क्रीनवर अर्जाचा फॉर्म दिसून येईल. त्या फॉर्मला काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन भरून घेण्यात यावे. तसेच मागण्यात आलेल्या आवश्यक त्या महत्वाच्या दस्तऐवजांची पूर्तता करा. सर्व प्रक्रिया झाल्यास एकदा लक्ष टाकून अर्जाचा फॉर्म सबमिट करून घ्या. तसेच त्या फॉर्मची एखादी प्रत काढून स्वतःजवळ ठेवा आणि दुसरी प्रत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या.
“आयकर आयुक्त, सातवा मजला, आयकर भवन, जुना रेल्वे स्टेशन रोड, कोच्चि – ६८२०१८”