फोटो सौजन्य - Social Media
आताच्या काळामध्ये अनेक गोष्टींमुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत चालला आहे. वाढत्या हृदयविकार साठी आपल्या रोजच्या सवयी आणि जीवनशैली कारणीभूत असते. आपण काय खातो? काय पीत आहोत? आपल्या चांगल्या सवयी तसेच आपल्या वाईट सवयी या सारख्या गोष्टी कारणीभूत असतात. चांगल्या सवयींमध्ये जास्त व्यायाम करण्याचा समावेश आहे. व्यायाम जेव्हा प्रमाणाच्या बाहेर केला जातो, तेव्हा त्याचा शरीराला फार नुकसान होत असतो. आपण अनेकदा पाहिले असेल कि व्यायाम करताना अनेक तरुणांचे मृत्यू होत आहे.
हे देखील वाचा : लैंगिक संबंधासाठी वयाचे नाही बंंधन, कोणत्याही वयात समाधानासाठी लक्षात ठेवा 6 गोष्टी
एकंदरीत, या मृत्यूला कारणीभूत व्यायामासारखी चांगली गोष्ट आहे. वाईट इतकेच कि त्याला कधी कधी मर्यादा ठेवल्या जात नाहीत. तसेच वाईट सवयी जशा कि धूम्रपान तसेच मद्यपान अशा गोष्टी आपल्या हृदयाला आणि त्याच्या कार्यक्षमतेला रोज रोज बिघडत असतात. शेवटी जे होतं ते सगळ्यांना दिसून येत. आपल्या हृदयाचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असले पाहिजे. आपण काय खातो? एकंदरीत, काय करत आहोत? या प्रत्येकावर आपले लक्ष असले पाहिजे.
ज्यावेळी शरीर या गंभीर परिस्थितून जात असतो. तेव्हा आपल्या शरीरमध्ये अनेक गोष्टी घडत असतात. अचानक छातीचे धडकने वाढत जाते. हृदयात एक वेगळाच तणाव जाणवतो. वातावरण जरी थन्ड असले किंवा वातावरण कसेही असले. तरी अंगाला खूप घाम फुटतो. अगदी पाण्यासारखा घाम अंगातून वाहू लागतो. मिनिटा मिनिटाला अशक्तपणा वाढत जातो. श्वास फुलणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे. बेशुद्ध पणा जाणवणे किंवा शरीर बेशुद्ध पडणे, या सर्व गोष्टी हृदयविकाराचा धक्का येताना घडत असतात. अशा वेळी काही औषधे आहेत? जे आपण आपल्या खिशामध्ये ठेवल्या पाहिजेत. त्यांचे खिशामध्ये असणे फार आवश्यक असते.
अशा मध्ये एक प्रश्न पडते कि, अशा वेळेत व्यक्ती भानावर असतो का? कि तो स्वतःहून जाऊन औषधे घेऊ शकेल? तर अशा वेळेत माणूस बिलकुल भानावर नसतो कि तो या सर्व गोष्टी करू शकेल. परंतु हार्ट अटक येण्याचा नंतर एक सुवर्ण काळ असतो, ज्यांमध्ये केली गेलेली धडपड आणि प्रयत्न फार महत्वाचे असतात. या दरम्यान, उपचार करण्यात आले तर कदाचित व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता असतात. व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याच्या तासाभराच्या आत हा सुवर्णकाळ असतो. या वेळेत केली गेलेली धडपड फार महत्वाची असते.
हे देखील वाचा : तुळशी विवाहासाठी घरासमोर काढा ‘ही’ सुंदर रांगोळी
मुळात, ही धडपड त्या व्यक्तीच्या जीवनासाठी महत्वाची असते. दरम्यान, जर नशिबाने त्या व्यक्तीला गोळ्या घेता आल्या, तर नक्कीच त्या व्यक्तीला त्याचा फायदा होईल. परंतु उपचार टाळता येणार नाही. उपचार घेणे फार महत्वाचे असते. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसू लागताच ऍस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट 5 मिग्रॅ सारखी औषधे घ्यावीत. ऍस्पिरिनची गोळी पाण्यात विरघळवून प्यावी. सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवावी. ही औषधे त्वरित रक्त पातळ करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात