फोटो सौजन्य - Social Media
आपल्या कामापासून व्यक्त झालेल्या व्यक्तींना पुन्हा कामावर रुजू व्हायची इच्छा असले तर ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. जर तुम्ही तुमच्या रिटायर जीवनापासून कंटाळला आहात आणि तुमच्या आधीच्या जीवनाला मिस करत आहात. तर तुम्हाला नक्कीच पुन्हा ते जीवन जगण्याची इच्छा असेल. अनेकांसोबत हे घडते, ही अतिशय सामान्य स्थिती आहे. असे म्हणतात कि,” पक्षी जेव्हा पिंजऱ्यामध्ये बंद असतो तेव्हा त्याला पिंजरा आवडत नसतो. परंतु, जेव्हा पिंजऱ्यापासून स्वतंत्र्य मिळते. तेव्हा तो या पिंजऱ्याच्या प्रेमात पडतो.” बहुतेक वेळा हे उदाहरण शाळेसाठी दिले जाते. कारण शाळा ही अशी गोष्ट आहे जीवनातून फक्त एकदाच जगता येते. परंतु, नोकरीच्या बाबतीत तसे नाही. जर तुम्ही रिटायर झाले आहात. तर पुन्हा नोकरी करता येते. हीच संधी सरकारने रिटायर झालेल्या व्यक्तींसाठी आणली आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्र TET परीक्षेसाठी नोंदणी सुरू, कधी होणार परीक्षा? अर्ज कधीपासून उपलब्ध? जाणून घ्या एका क्लिकवर
इंडियन कौन्सिल ऑफ सोशिअल सायन्स रिसर्च (ICSSR)ने ही भरती आणली आहे. या भरती प्रकियेमध्ये त्या उमेदवारांना भरती केली जाणार आहे, जे रिटायर झाले आहेत. एकंदरीत, रिटायर उमेदवारांना सरकारी क्षेत्रामध्ये काम करता येणार आहे. या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना icssr.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे याच ठिकाणी अधिसूचनेचा आढावा घ्यावा असे आवाहन आहे. या अधिसूचनेमध्ये या भरती विषयी सखोल माहिती नमूद आहे, जी इच्छुक उमेदवारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा : सांगलीतील सर्व शाळांमध्ये ३० सप्टेंबर पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करा! पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे निर्देश
अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारांना ५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवारांचे जास्तीत जास्त वय ६२ वर्षांइतके असावे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून कंसल्टेंट (लीगल)चे १ पद, कंसल्टेंट (ऑडिट)चे ०३ पद तर कंसल्टेंट (एडमिन)चे ०१ पद भरले जाणार आहे. उमेदवारांना नोटिफिकेशनचा आढाव घेऊन त्यावर पुरलेला फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांना हा फॉर्म “इंडियन काउंसिल ऑफ सोशल साइंस रिसर्च, अरुण असफ अली मार्ग, नवी दिल्ली-११००६७” या पत्त्यावर पाठवायचा आहे. महत्वाची गोष्ट अशी कि उमेदवारांची नियुक्ती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.