फोटो सौजन्य - Social Media
भारतात अनेक युवा आहेत ज्यांना फोटोग्राफीचा विशेष छंद असतो. त्यांच्या मनामध्ये फोटोग्राफीसाठी एक विशेष जागा असते. काही तरी वेगळे आणि सुंदर दिसले तर त्यांच्या मनात पाहिला येणारा विचार म्हणजे त्या दृश्याला कायमचे कैद करावे, जेणेकरून ते दृश्य नजरेत तर साठेलच पण पुन्हा पुन्हा ते पाहता येईल. काही लोकं या छंदाला छंद म्हणूनच पाहतात. तर काही जण या छंदापासून चांगली कमाई करतात. तुम्ही काढलेल्या फोटोग्राफ्सपासून तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम खूप मोठी ठरू शकते. इतकी कि काही विद्यार्थी फोटोग्राफीच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. स्वतःच्या कष्टाने स्वतःचे शिक्षण घेत आहेत. एक प्रकारे या माध्यमातून तुम्ही स्वावलंबी बनू शकता.
फोटाग्राफीच्या क्षेत्रात खूप मोठे भविष्य सजू शकते. पण याची सुरुवात आताच करणे जास्त आवश्यक आहे. फोटाग्राफीच्या क्षेत्रात अनुभव आणि कौशल्य दोन्ही महत्वाचं असतात. व्यक्तीचे कौशल्य अनुभवाने वाढते. त्यामुळे आता सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर घालायचे आहे तर हे लेख शेवटपर्यँत वाचा. यातील प्रत्येक मुद्दा तुमच्या कामी येणार आहे तसेच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. चला मग जाणून घेऊया फोटोग्राफी करून कमावण्याच्या माध्यमांविषयी:
सोशल मीडिया हा प्रमुख माध्यम ठरू शकतो. आताचं काळात बहुतेक सारेच सोशल मीडियावर असतात. त्याच्या फायदा घेत आपण आपली ब्रॅण्डिंग करू शकतो. सोशल मीडियावर आपण काढलेले फोटोज पोस्ट करत आपली मार्केटिंग होऊ शकते. सोशल मीडियावर अनेक ब्रॅण्ड्स असतात जे अनके फोटोग्राफी क्षेत्रातील युवांना कॉलेब्रेशन करण्याची संधी प्रदान करतात. सोशल मीडिया सहित स्टॉक फोटोग्राफी उत्तम पर्याय ठरू शकतो. येथे विविध प्रकारचे फोटो आय स्टॉक, शटर स्टॉकसारख्या ठिकाणी विकून चांगली कमाई होऊ शकते. त्याचबरोबर फोटोज ऑनलाईन स्टोअर आणि अनेक कंपनीदेखील विकत घेतात, ज्यांच्या माध्यमातून अनके फोटोग्राफर पैसे कमवत आहेत.
हे सुद्धा वाचा : तुम्हाला कायदा क्षेत्रातील ‘या’ विकल्पांबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या
अनेक कार्यक्रमामध्ये फोटोग्राफरला मागणी असते. अशा ठिकाणी इव्हेंट फोटोग्राफी करू शकता. त्याचबरोबर फूड फोटोग्राफी करून जण अनेक मालामाल झाले आहेत. घरबसल्या मुलांचे फोटोग्राफीचे क्लासेस घेऊन देखील चांगल्या रक्कमेत कमवता येऊ शकते. या माध्यमातून फोटाग्राफी सुरुवातीला रोजगार प्रदान करते. खासकरून, विद्यार्थ्यांनी या माध्यमांचा विचार करावा.