फोटो सौजन्य - Social Media
या कोर्सची माहिती म्हणजे रिटेल मॅनेजमेंट MBA हा २ वर्षांचा पीजी स्तरावरील अभ्यासक्रम आहे. यामध्ये उत्पादन, पुरवठा साखळी, विक्री, मार्केटिंग आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया यांचा समावेश आहे. जर तुम्ही व्यावसायिक आहेत किंवा नुकतेच एखाद्या व्यवसायाचा श्रीगणेशा केले असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरेल. तसेच नोकरी करता-करता हा कोर्स करू शकता, त्यामुळे आपले काम सुरु ठेवून आपले करिअर घडवता-घडवता या क्षेत्राचा अभ्यास करता येणार.
बहुतेक विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. प्रवेश परीक्षेनंतर वैयक्तिक मुलाखत (PI) आणि गट चर्चा (GD) फेरी घेण्यात येईल. उमेदवारांना प्रवेश मिळवण्यासाठी PI आणि GD या दोन्ही फेऱ्यांना पार करावे लागेल. उमेदवारांच्या विषयज्ञान, व्यवस्थापन क्षमता आणि नेतृत्वगुणांची चाचणी करण्यात येईल. रिटेक मॅनेजमेंट MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही संस्थनांमध्ये प्रवेश प्रक्रिया पात्र करावी लागते. या प्रवेश प्रक्रियेत CAT, MAT, XAT तसेच CMAT यांचा समावेश आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज






