फोटो सौजन्य - Social Media
इंडियन कोस्ट गार्ड (ICG)ने अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेमध्ये ICG च्या आगामी भरती प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती जाहीर करण्यात आली आहे. मुळात, या भरती प्रक्रियांच्या माध्यमातून नाविक पदासाठी उमेदवाराणहची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे पद दोन विविध विभागातील आहेत: जनरल ड्युटी आणि डोमेस्टिक ब्रांच. एकूण ३०० रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. २१ जानेवारी रोजी या भरती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नाविक पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही निकषांना पात्र करणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात महत्वाची माहिती:
आज या भरतीची संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ११ फेब्रुवारी रोजी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात येणार आहे. तसेच २५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. नियुक्तीसाठी उमेदवारांना परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे. परंतु, या परीक्षेची तारिलख अद्याप पंजाहीर करण्यात आली नाही आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. तसेच येथे या भरती संदर्भात अधिक माहितीही पुरवण्यात आली आहे.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यास काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त २२ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जनरल ड्युटी शाखेतील नाविक पदासाठी एकूण २६० जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करता उमेदवार गणित विषयासह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच डोमेस्टिक शाखेतील नाविक पदासाठी एकूण ४० जागा रिक्त आहेत. दहावी उत्तीण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करताना उमेदवारांना काही ठराविक रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवार या भरतीसाठी ३०० रुपये अर्ज शुल्क भरणार आहेत. तर OBC आणि EWS प्रवर्गासाठी अर्ज शुलकाची रक्कम सारखीच निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवराग, जसे कि SC आणि ST, या प्रवर्गातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्कात मुभा देण्यात आली आहे. यांना निशुल्क अर्ज करता येणार आहे.