फोटो सौजन्य - Social Media
कॉलेजचा पहिला दिवस प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात खूप खास असतो. शाळेनंतर एक नवीन टप्पा सुरू होतो आणि त्याचं स्वागत योग्य पद्धतीने करणं गरजेचं असतं. पण या पहिल्या दिवसाला ‘गेम ओव्हर’ नको वाटायला, म्हणून काही चुका टाळणं अत्यावश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया कॉलेजच्या पहिल्या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
तयारीची सुरुवात आदल्या रात्रीच करा
कॉलेजच्या पहिल्या दिवशी गडबड गोंधळ टाळायचा असेल, तर आवश्यक वस्तू जसं की पेन, नोटबुक, कॉलेज बॅग, ओळखपत्र, यांचं व्यवस्थित नियोजन एक रात्री आधीच करून ठेवा. यामुळे सकाळी गडबड होणार नाही आणि तुम्ही वेळेत कॉलेजला पोहोचू शकाल.
ड्रेसिंगमध्ये असू द्या कंफर्ट आणि कॉन्फिडन्स
पहिल्या दिवशी काय घालायचं याचा गोंधळ अनेकांना होतो. न अतिशय फॉर्मल आणि न फार कॅज्युअल, असा मध्यम मार्ग निवडा. असा पेहराव ठेवा की ज्यात तुम्हाला आत्मविश्वास वाटेल आणि तुम्ही सहज वावरू शकाल.
वेळेचे भान ठेवा
कॉलेजच्या पहिल्या दिवशी वेळेवर पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. उशिरा आल्यास पहिल्या दिवशीच तुमचं इम्प्रेशन बिघडू शकतं. त्यामुळे वेळेचं काटेकोर पालन करा.
संवाद साधा, पण संयमानं
नवीन लोक, शिक्षक, सीनियर्स हे सगळं नवीन असतं. त्यामुळे अनेक जण गप्प राहतात किंवा संवाद टाळतात. पण आधीच घाबरून न जाता, सभ्यपणे आणि आदरपूर्वक संवाद साधण्याचा प्रयत्न करा. ही सवय पुढील कॉलेज जीवनात खूप उपयोगी पडते.
शिस्त आणि सहभाग
शिक्षकांनी दिलेल्या सूचना नीट ऐका. शाळेपेक्षा कॉलेज थोडं वेगळं असतं, त्यामुळे अधिक स्वावलंबी आणि जबाबदार राहणं गरजेचं असतं. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच विविध उपक्रमात सहभाग घ्या.
कॉलेजचा पहिला दिवस हा तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय असतो. त्यामुळे थोडी तयारी, योग्य वागणूक आणि आत्मविश्वास यामुळे तो दिवस लक्षात राहील असा ठरवता येतो. चुका टाळा, आत्मविश्वास ठेवा आणि नवीन सुरुवात आनंदात करा!