फोटो सौजन्य - Social Media
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था (ISRO) ने 2025 मध्ये विविध वैज्ञानिक/इंजिनियर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, आर्किटेक्चर आणि रेफ्रिजरेशन-अँड-एअर कंडिशनिंग शाखांमध्ये डिग्रीधारकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जून 2025 पासून isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे, जी 14 जुलै 2025 पर्यंत खुली राहणार आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत ISRO मध्ये एकूण 39 पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांकडे संबंधित शाखेतील BE/B.Tech किंवा B.Arch डिग्री असणे आवश्यक आहे आणि किमान 65% गुण किंवा 6.84 CGPA असले पाहिजे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. ऑफलाइन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज नाकारले जातील.
वयोमर्यादा व आरक्षण: ISRO भरतीसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 14 जुलै 2025 रोजी 28 वर्षे असावी. OBC, SC/ST उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
पगार व भत्ते: या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना Pay Matrix Level 10 नुसार ₹56,100/- बेसिक पगार दिला जाईल. याशिवाय DA, HRA, ट्रॅव्हल आणि वैद्यकीय भत्ते मिळणार आहेत.
अर्ज शुल्क आणि परतावा योजना: प्रत्येक अर्जासाठी ₹750 शुल्क आहे. एकाहून अधिक पदांसाठी अर्ज केल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र ₹750 भरावे लागेल. SC/ST, महिला, PwBD व माजी सैनिक यांना पूर्ण रक्कम परत मिळेल, तर इतर उमेदवारांना ₹500 परत मिळतील.
ISRO या भरतीसाठी अशा प्रकारे करता येईल अर्ज:
ही भरती प्रक्रिया एक सुवर्णसंधी आहे अशा अभियंत्यांसाठी जे ISRO मध्ये सरकारी नोकरी शोधत आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अधिकृत अधिसूचना ISRO च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे.