फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रीय बहुदिव्यांगता जन सशक्तीकरण संस्था (NIEPMD) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, सहायक संचालक, प्रशिक्षक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती तमिळनाडूच्या चेन्नई शहरातील मुख्य कार्यालय तसेच पुडुचेरीतील कराईकल येथील समग्र क्षेत्रीय दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी (CRC) करार पद्धतीने केली जाणार आहे. एकूण ११ पदांसाठी ही भरती होत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. विशेष म्हणजे ही भरती सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या संस्थेमार्फत केली जात असून, सरकारच्या महत्वाकांक्षी दिव्यांगजन सशक्तीकरण योजनेचा भाग आहे.
अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारांना ₹590 शुल्क भरावे लागेल, तर SC, ST, महिलांंना, दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी niepmd.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. शंका किंवा अधिक माहिती आवश्यक असल्यास niepmdhra@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल.
NIEPMD ही संस्था २००५ साली स्थापण्यात आली असून ती चेन्नईजवळ मुत्तुकाडू येथे वसलेली आहे. ही संस्था देशातील अशा दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करते ज्यांना एकाहून अधिक प्रकारच्या अडचणी असतात. संस्था शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन, संशोधन, धोरण निर्मिती आणि सामाजिक समावेशाच्या क्षेत्रात काम करते. या संस्थेमार्फत देशभरातील अनेक दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवले गेले आहे.
ही भरती केवळ रोजगाराची संधी नाही, तर समाजसेवेची आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणात आपले योगदान देण्याचीही संधी आहे. त्यामुळे पदवीधर, पदव्युत्तर किंवा शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रात रुची असलेले उमेदवारांनी नक्कीच या संधीचा लाभ घ्यावा.
एकंदरीत, राष्ट्रीय बहुदिव्यांगता जन सशक्तीकरण संस्था (NIEPMD) या भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण ११ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती करार तत्वावर आधारित आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क म्हणून ५९० रुपये भरावे लागणार आहेत. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना niepmd.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.