देशभरात लाखो विद्यार्थी हे बैंकिंग क्षेत्राची तयारी करत असतात. बँकिंग क्षेत्रातील करियर सुरक्षित मानल जात. मोठ्या बँकांमध्ये नोकरी मिळावी यासाठी अनेक जण धडपडत असतात, मात्र जर तुम्हाला खरच नोकरी साठी अर्ज करायच आहे तर ही बातमी नक्की वाचा.
आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराच्या नावात बदल! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
दरवर्षी एसबीआय हजारो विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी देते. यंदा एसबीआय ने ६ हजार ५८९ जागांची जाहिरात काढली आहे. एसबीआय क्लर्क या पदासाठी जाहिरात देण्यात आली आहे. या पदासाठीची पूर्व परीक्षेच वेळापत्रक त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. sbi.co.in या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता.
परीक्षा कशी देता येईल ?
या परीक्षेसाठी आधी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल . अर्ज केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना याची परीक्षा देता येईल . पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा आणि त्या नंतर मुलाखत अशा तीन टप्प्यात ही परीक्षा पार पडणार आहे त्या नंतर तुमच यामध्ये सिलेक्शन होवू शकत .
कस आहे वेळापत्रक ?
एसबीआय क्लर्क परीक्षेच वेळापत्रक जाहीर करण्यात आल आहे त्यानुसार २०,२१ आणि २७ सप्टेंबरला पूर्व परीक्षा होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही पूर्व परीक्षा पार पडेल. पूर्व परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढे मुख्य परीक्षा देता येईल. तीन टप्पे पास झालेल्या विद्यार्थ्याना जूनियर असोसोसिएट ( सपोर्ट एंड सेल) या पदावर काम करण्याची संधी दिली जाईल.
तुम्हाला जर खरच बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे तर त्यासाठीची अभ्यासक्रम आणि तयारीची पुस्तक बाजारात उपलब्ध आहेत. यंदा निघालेल्या जागांमध्ये तुम्ही तुमच नशीब आजमावू शकता. या संदर्भातील अधिक माहिती एसबीआय च्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. तिथे नक्की भेट द्या आणि अधिकृत वेळापत्रक जाणून घ्या. आमच्याकडून ही तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा !
10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी
सरकारी नोकरी ही आजही सर्वसामान्यांना महत्त्वाची वाटते. पण तुम्ही जास्त शिकला नसाल तर अशी सरकारी नोकरी मिळू शकते का असा प्रश्न बऱ्याच जणांना निर्माण होतो आणि त्याचं उत्तर हो असं आहे. तुम्ही केवळ १० वी उत्तीर्ण असाल तरीही या पदासाठी अर्ज करू शकता. ४५५ पदांसाठी भरती असून पगारदेखील चांगला मिळणार आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि देशातील आघाडीची गुप्तचर संस्था इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. IB ने सुरक्षा सहाय्यक (ट्रान्सपोर्ट मोटर ट्रान्सपोर्ट) च्या ४५५ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.mha.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
परीक्षा जवळ आलीये? अजून विषयांचे नाव ठाऊक नाहीत? एका रात्रीत असा करा अभ्यास