फोटो सौजन्य - Social Media
इसरोमध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीचे अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार [apps.shar.gov.in](https://apps.shar.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक आहात तर निश्चित करण्यात आलेली मुदत तपासून घेण्यात यावी.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इसरो ही भारत सरकारची राष्ट्रीय अंतराळ संस्था असून ती देशात अंतराळ तंत्रज्ञानाचा विकास आणि संशोधनाची कामे करते. रॉकेट प्रक्षेपण, उपग्रह तंत्रज्ञान, हवामान निरीक्षण, संचार व्यवस्था आणि अवकाश मोहिमांमध्ये इसरोने जगभरात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता तुम्हालाही या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळू शकते.
पात्रता आणि शैक्षणिक अर्हता पाहिली तर, इसरोच्या या भरतीमध्ये पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. काही पदांसाठी बी.ई., बी.टेक., बी.एस्सी. इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा धारक उमेदवार पात्र आहेत, तर काही पदांसाठी केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, बी.ए., बी.एस्सी., पदवीधर, एसएसएलसी, एसएससी उत्तीर्ण उमेदवार तसेच आयटीआय किंवा नर्सिंग डिप्लोमा धारक उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रतेसंबंधी सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेतून तपासावी.
अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा. फॉर्ममध्ये आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. अर्ज सादर करताना दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2025 आहे.
महत्त्वाचे मुद्दे
अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. इसरोमध्ये काम करणे म्हणजे भारताच्या अंतराळ मोहिमेचा एक भाग बनण्याचा अभिमान मिळवणे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करण्यास विलंब करू नये.