Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलींसाठी CBSE चा मोठा निर्णय! विद्यार्थिनींना मिळणार हक्काची सुविधा, आता प्रत्येक शाळेत असणार ‘मासिक पाळी आरोग्य केंद्र’

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये 'मासिक पाळी आरोग्य केंद्र' उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 22, 2026 | 07:37 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Every CBSE School Will Have a Menstrual Health Center :  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थिनींच्या हितासाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता सीबीएसईशी संलग्न असलेल्या सर्व शाळांमध्ये ‘मासिक पाळी आरोग्य केंद्र’ उभारणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाच्या अनुषंगाने घेण्यात आला आहे.

NEET UG 2026 : तुम्हालाही सरकारी मेडिकल कॉलेजमधून MBBS करायचंय? मग NEET UG परीक्षेत किमान ‘इतके’ गुण मिळवणं आहे अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेतलेला निर्णय

२० जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की, मासिक पाळीच्या काळात स्वच्छता आणि आवश्यक सुविधा मिळणे हा विद्यार्थिनींचा एक मूलभूत अधिकार आहे. न्यायालयाने हे देखील स्पष्ट केले की, जर एखाद्या शाळेत या सुविधांचा अभाव असेल, तर त्याचा परिणाम तिथे शिकणाऱ्या मुलींच्या शिक्षणावर आणि आत्मविश्वासावर प्रतिकूल होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन, विद्यार्थ्यींनींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा असुविधेचा सामना करावा लागू नये, यासाठी न्यायालयाने ‘मासिक पाळी आरोग्य केंद्रे’ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.

मासिक पाळी आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा

शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशांवर आधारित, CBSE ने शाळांसाठी काही आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. जेणेकरून विद्यार्थिनींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील. या केंद्रांवर सॅनिटरी नॅपकिन्स जे मासिक पाळीसाठी वापरले जाते ते पॅड्स सहजपणे उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, स्वच्छता आणि आरोग्यविषयक बाबींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. ही ‘मासिक पाळी आरोग्य केंद्रे’ शाळेच्या आवारातच स्थापन केली जातील आणि मासिक पाळीशी संबंधित कचऱ्याची (waste) योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करणे अनिवार्य असणार आहे. तसेच, शाळांना मासिक पाळीविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असणार आहेत. NCERT आणि संबंधित राज्यांच्या SCERTs ने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या विषयांवर मुक्त संवादाला प्रोत्साहन दिले जाईल, जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही संकोचाशिवाय या विषयांवर चर्चा करू शकतील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शाळांमध्ये एक सुरक्षित आणि जागृत वातावरण निर्माण करणे हा आहे, जिथे मुलींना त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या किंवा शंका मांडताना सहज आणि सुरक्षित वाटेल.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे तितकंच महत्त्वाचं

आपल्या आदेशात, CBSE ने हे देखील स्पष्ट केले आहे की केवळ सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नाही; तर या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या उद्देशाने, आरोग्यविषयक सत्रे, पौगंडावस्थेतील बदलांविषयीचे शिक्षण (puberty education) आणि लिंग-संवेदनशील चर्चासत्रे वेळोवेळी आयोजित केली जातील याची काळजी घ्यावी. यामागील उद्देश हा आहे की, विद्यार्थी मग ते मुलगे असोत किंवा मुली या विषयाला नीट समजून घेतील आणि त्याविषयी मनात असलेला कोणताही संकोच किंवा सामाजिक कलंक ज्या चुकीच्या मान्यता आहेत त्या दूर करतील.

सविस्तर अहवाल शाळांना सादर करणे आवश्यक

या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये झालेली प्रगती आणि उचललेली पावले यांचा सविस्तर अहवाल शाळांना सादर करणे देखील आवश्यक असेल. CBSE ने एक अहवाल प्रणाली देखील लागू केली आहे. सर्व शाळांनी या संदर्भातील आपल्या तयारी आणि सुविधांविषयीचे मासिक अहवाल सादर करणे अनिवार्य आहे. पहिला अहवाल ३१ मार्च २०२६ पर्यंत, तर दुसरा अहवाल ३० एप्रिल २०२६ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 2800 पेक्षा जास्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Web Title: Major decision by cbse for girls students to receive an essential facilitynow every school will have a menstrual health center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • Career News
  • CBSC
  • education
  • period
  • School

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.