फोटो सौजन्य - Social Media
राज्यात बारावीची परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षा केंद्रावर मोठ्या सुरक्षेसह परीक्षा होत आहेत. लवकरच दहावीच्या परीक्षेलाही सुरुवात केली जाईल. अशामध्ये राज्य मंत्री मंडळाने एक महत्वाचे निर्णय जाहीर केले आहे. बोर्डाच्या परीक्षेत अनेकदा कॉपीचे प्रकरणे समोर येत असतात. अशा प्रकरणामध्ये काही प्रकरणे अशी असतात, जेथे सामूहिक कॉपीसारखा पारकर घडतो. कधी कधी या प्रकारात तेथील कर्मचारीवर्ग आणि शिक्षकही शामिल असतात. अशांवर कडक कारवाई केली जाईल तसेच त्यांना पदावरून बडतर्फ केले जाईल.
राज्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात राज्य मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये परीक्षा संदर्भात अनेक निणर्य घेण्यात आले तसेच चारचा करण्यात आली. एकदंरीत, परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना एंट्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुळात, परीक्षेला जाताना कोणत्याही प्रकारचे पुस्तके, नोटस्, मोबाईल इ. साहित्य जाचाला बाळगता येणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. तसेच बैठकीत पोलीस अधिकारी आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत. शहरी भागात ही जबाबदारी पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. परीक्षा व्यवस्थापनात शिस्त राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांच्या परीक्षांच्या दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील परीक्षा केंद्रांना स्वत: भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, असा आदेशही देण्यात आला आहे.
संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण वेळ कडक नजर ठेवण्यात यावी. तसेच सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करावा, बैठी पथके नियुक्त करावीत आणि व्हिडिओ कॅमेरे कार्यान्वित ठेवावेत, यावर भर देण्यात आला आहे. या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एका विभागप्रमुख आणि उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
विशेषत: सर्व परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठी पथके नेमण्यात यावीत. ही पथके परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचून संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षितपणे कस्टोडियनकडे जमा होईपर्यंत या पथकाला नियंत्रण ठेवावे लागेल. संवेदनशील केंद्रांवर वरिष्ठ आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करून परीक्षा व्यवस्थापन अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सूचनांवर भर देत परीक्षांचा वातावरण नितळ आणि पारदर्शक ठेवण्याचे महत्व अधोरेखित केले आहे.