फोटो सौजन्य - Social Media
नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL), कोल इंडिया लिमिटेडची एक मिनी रत्न कंपनी, यांनी अधिसूचना क्रमांक NCL/HQ/PD/Manpower/DR/2025-26/65 नुसार २०० टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही पदे फिटर, इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर ट्रेनी या श्रेणींसाठी असून, मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील खाणी आणि आस्थापनांमध्ये नियुक्त केले जाणार आहेत.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १७ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०२५ आहे. ही भरती संगणक आधारित चाचणी (CBT), दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांद्वारे पार पाडली जाणार आहे. ITI पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही भारतातील आघाडीच्या कोळसा उत्पादक कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे.
या भरतीसाठी काही वयोमर्यादा निकष जाहीर करण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १० मे २०२५ या तारखेनुसार, १८ वर्षे ते ३० वर्षे पूर्ण असावे. शासनाच्या नियमानुसार काही प्रवर्गांना सूट लागू करण्यात आली आहे.
नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात संगणक आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. दस्तऐवजांची पडताळणीसह वैद्यकीय तपासणीसाठी उमेवारांना उपस्थित राहावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.