फोटो सौजन्य - Social Media
विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पॉलिसी स्पेशालिस्टची २ पदे आणि कन्सल्टन्टची १० पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती नवी दिल्लीतील विदेश मंत्रालयाच्या साउथ ब्लॉक व जवाहरलाल नेहरू भवन येथील कार्यालयांमध्ये होणार आहे.
पॉलिसी स्पेशालिस्ट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा कमाल २.२५ लाख रुपये इतका स्टायपेंड दिला जाणार आहे. तर कन्सल्टन्ट पदासाठी वार्षिक कमाल १० लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे. ही सर्व नियुक्ती सुरुवातीला एका वर्षाच्या करारावर असणार असून, कामगिरी आणि गरजेनुसार कराराची मुदत वाढवली जाऊ शकते.
निवड झालेल्या उमेदवारांना ब्रिक्सच्या विविध वर्किंग ग्रुप्समध्ये जसे की व्यापार, वित्त, ऊर्जा, कृषी आणि आरोग्य क्षेत्र काम करावे लागणार आहे. तसेच ब्रिक्स देशांमधील व आंतरराष्ट्रीय बैठका, चर्चा आणि वाटाघाटींमध्ये मंत्रालयाला सहाय्य करणे, निष्कर्षात्मक दस्तऐवजांचा मसुदा तयार करणे ही जबाबदारी असणार आहे. कन्सल्टन्ट्सना सादरीकरणे, पोजिशन पेपर्स, मीडिया संदर्भातील सामग्री तयार करणे, विविध देशांच्या धोरणांवर लक्ष ठेवणे आणि मंत्रालये व थिंक टँक्सशी समन्वय साधणे यासारखी कामे करावी लागतील.
पात्र उमेदवारांनी विदेश मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून निर्धारित अर्ज नमुना डाउनलोड करावा. भरलेला अर्ज रजिस्टर्ड पोस्टद्वारे जवाहरलाल नेहरू भवन येथील अवर सचिव (PF & PG) यांच्या पत्त्यावर पाठवता येईल. तसेच अर्ज aopfsec@mea.gov.in या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखत किंवा लेखी परीक्षेबाबतची माहिती ई-मेलद्वारे कळवण्यात येणार आहे. सरकारी धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक व्यासपीठावर काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती निश्चितच एक महत्त्वाची करिअर संधी ठरणार आहे.






