सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये विविध पदांसाठी भरती!
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर), महाव्यवस्थापक (वित्त), महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन), हिंदी अनुवादक, कनिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
भरली जाणारी पदे :
1. मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर) – १ जागा
2. महाव्यवस्थापक (वित्त) – १ जागा
3. महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन) – १ जागा
4. हिंदी अनुवादक – १ जागा
5. कनिष्ठ हिंदी अनुवादक – १ जागा
एकूण पद संख्या – 05 पदे
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता?
मुख्य महाव्यवस्थापक (कायदेशीर) – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी.
महाव्यवस्थापक (वित्त) – वाणिज्य / लेखा क्षेत्रातील पदवी
महाव्यवस्थापक (जमीन संपादन आणि इस्टेट व्यवस्थापन)- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पदवी
हिंदी अनुवादक – पदव्युत्तर पदवी
कनिष्ठ हिंदी अनुवादक – पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2024
वयोमर्यादा : 56 वर्षे
कसा कराल अर्ज
– या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
– खाली दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करायचा आहे.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2024 आहे.
– दिलेल्या मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : https://nhai.gov.in/nhai/sites/default/files/vacancy_files/Detailed_Adv_combined_Rev_0.pdf
अधिकृत वेबसाईट : https://nhai.gov.in/