(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अनिल कपूर यांनी त्यांच्या शानदार कारकिर्दीत अनेक मोठे हिट चित्रपट दिले आहेत आणि त्यांच्या सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक म्हणजे “नायक”. हा राजकीय चित्रपट आजही प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. 2026 या वर्षात अनेक गाजलेल्या बॉलिवूड सिनेमांचे स्क्वीवेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता चाहते २००१ च्या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी आग्रही आहेत. आता, अनिल कपूर यांनी चित्रपटाचे हक्क मिळवल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,”सनम तेरी कसम” (२०१६) चे निर्माते दीपक मुकुट यांच्याकडे “नायक” चे हक्क होते. असे वृत्त आहे की अनिल कपूर यांनी त्यांच्याकडून हे हक्क मिळवले आहेत.अनिल कपूर यांचा नायक हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपट जवळपास 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा येणार असल्याची चर्चा आहे. अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असून त्याचा सीक्वेल करण्याची त्यांची इच्छा आहे.
अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी यांचा ‘नायक: द रिअल हिरो’ ७ सप्टेंबर २००१ रोजी प्रदर्शित झाला. एस. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांच्या १९९९ च्या तमिळ चित्रपट ‘मुधलवन’ चा रिमेक होता. नायकने अलीकडेच २४ वर्षे पूर्ण केली. चित्रपटाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त, अनिल कपूरने त्यांच्या नवीनतम इंस्टाग्राम पोस्टमध्ये चित्रपटातील अनेक चित्रे शेअर केली आहेत.
ए. एस. रत्नम यांनी निर्मित केलेल्या ‘नायक’ चित्रपटात एका निर्भय पत्रकाराची कथा मांडण्यात आली होती, जो एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो. त्या मर्यादित वेळेत तो अनेक धाडसी निर्णय घेतो, ज्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणतो. प्रदर्शित होताना चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण हळूहळू तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आणि पुढे जाऊन त्याला कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला.






