फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यदल, नौदल व हवाई दलामध्ये अधिकारी म्हणून भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण CDS कोर्स क्र. 65 या नावाने ओळखले जाते आणि दि. 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन व प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या CDS परीक्षेची शिस्तबद्ध व व्यावसायिक तयारी करण्याची संधी देते.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी दि. 5 जून 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून CDS-65 कोर्ससाठी अर्ज करून प्रवेशपत्र आणि आवश्यक परिशिष्टे भरून, त्याचे प्रिंटआउट घेऊन मुलाखतीस उपस्थित राहावे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करताना उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने UPSC च्या CDS परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा. ही पात्रता अनिवार्य असून, संबंधित पुरावे प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहतेवेळी सादर करावे लागतील.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी खालील माध्यमांद्वारे संपर्क साधावा:
उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरातीचा आढावा घेण्यात आला आहे.