फोटो सौजन्य - सोशल मीडिया
President of India Salary: भारताचे राष्ट्रपती (President Of India) हे देशाचे प्रमुख असण्यासोबतच पहिले नागरिकही असतात. तसेच ते देशाचे ‘कमांडर इन चीफ’ असतात. ज्यांची निवड मतदार संघाच्या सदस्यांद्वारे केली जाते. पण तुम्हाला माहिती आहेत का? की, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचा पगार किती होता ? आणि आजच्या काळात राष्ट्रपतींचा पगार किती आहे? चला तर मग जाणून घेऊया…
आजच्या काळात राष्ट्रपतीच्या पगाराबाबत बोलायचे झाले तर 2016 पर्यंत त्यांचा पगार 1.5 लाख रूपये प्रतिमहिना होता. जो आज वाढून 5 लाख रुपये प्रतिमहिना झाला आहे. म्हणजेच यामध्ये 200% वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना या पगारावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. याशिवाय त्यांना राहण्यासाठी भव्य राष्ट्रपती भवन, मोफत उपचार, सुरक्षा आणि इतर अनेक सुविधाही मिळतात.
26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा देशाचे संविधान लागू झाले, तेव्हा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांनी कार्यभार स्वीकारला. आजपर्यंतच्या इतिहासात हे असे राष्ट्रपती आहेत ज्यांनी राष्ट्रपती भवनात 12 वर्षे घालवली. त्या काळात राष्ट्रपतींचा पगार आजच्या तुलनेत खूपच कमी होता. पूर्वी त्यांचा पगार फक्त 10 हजार रुपये होता. या पगाराचा अर्धा हिस्सा म्हणजेच केवळ 5,000 रूपये घेत असत. इतकेच नाही तर आपल्या कार्यकाळात शेवटी ते केवळ 2,500 रुपये मानधन घेत असत. ते आपली सर्व कामे स्वत:च करायचे. त्यांनी केवळ एकच वैयक्तीक कर्मचारी ठेवला होता. मात्र काळ बदलला महागाई वाढली आणि जबाबदारीही वाढली त्यामुळे त्यांच्या पगारातही वाढ करण्यात आली .
जर पुर्वीच्या काळातील पगाराची आणि आजच्या काळातील पगाराची तुलना केली तर मोठी तफावत दिसून येते. पूर्वी राष्ट्रपतींना पगार आणि सुविधाही कमी मिळायच्या. परंतु, आता राष्ट्रपतींना मोठी सुरक्षा टीम, अलिशान गाड्या, मोफत प्रवास आणि मोठ्य़ा स्टाफची सुविधा मिळते. आज राष्ट्रपती भवनात 340 खोल्या आहेत. तसेच तिथे शेकडो लोक काम करतात.
भारतात राष्ट्रपतीचे पद केवळ त्यांच्या कार्यकाळापुरतेच खास नसते तर निवृत्तीनंतरही त्यांना अनेक सुविधा मिळतात. माजी राष्ट्रपतींना 2.5 लाख रुपये पेन्शन मिळते इतकेच नाही तर त्यांच्या पत्नीलाही सचिवालयातील मदतीसाठी प्रतिमहिना 30 हजार रुपयांची रक्कम मिळते. सोबतच त्यांना किमान 8 खोल्यांचा बंगला आणि प्रवासाची सुविधा मिळते. तसेच सुरक्षा आणि 5 लोकांचा वैयक्तिक स्टाफ ही मिळतो याच कारणामुळे राष्ट्रपतींचे पद सर्वात सन्मानित आणि सोयी सुविधांनी युक्त पदांमध्ये गणले जाते.
हे पण वाचा-






