कोण आहे अमित उपाध्याय? ४० कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस प्रकरणात मुंबईत कशी झाली अटक?
40 crore GST Scam: मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. GSTची बनावट बीले तयार करून सुमारे ४० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जीएसटी विभागाने अमित उपाध्याय नावच्या व्यक्तीला अटक केली असून ते ८ पेक्षा अधिक कंपन्यांचा संचालक असल्याचेही समोर आले आहे. उपाध्याय याने बनावट कागदपत्रे आणि खोट्या व्यवाहरांच्या आधारे मोठ्या प्रमाणात जीएसटी रिर्टन मिळवल्याचा आरोप आहे.
जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (Directorate General of GST Intelligence) तपासात कोणताही वस्तू किंवा सेवेचा पुरवठा न करता केवळ बनावट इनव्हाईसच्या आधारे इनपुट क्रेडिट टॅक्स (ITC) घेतल्याचे उघड जाले आहे. या प्रकरणात अमित उपाध्याय विरोधात MRA मार्ग पोलिस स्टेशन आणि सक्तवसूली संचलनालयाकडे तक्रारी दाखल असल्याची माहिती आहे.
MRA मार्ग पोलिस ठाण्यात अनिस खान यांनी अमित उपाध्याय विरोधात आर्थिक फसवणूक आणि कट रचल्याची तक्रार दिली आहे. तपासात उपाध्याय हा अल्फानिऑन टेकसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Alphaneon Techsolutions Private Limited) तसेच अल्फानोऑन ग्रुपच्या इतर सात कंपन्यांचा संचालक आणि अधिकृत स्वाक्षरीकर्ता असल्याचेही निदर्शनास आले आहे.
१४ मे 2026 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान मुंबईत वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी चंद्रशेखर तिवारी यांनी उपाध्यायला अटक केली. तपास यंत्रणांच्या माहिती नुसार, अमित उपाध्याय आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कोणतीही प्रत्यक्ष सेवा किंवा वस्तू पुरवठा न करता केवळ बोगस बिले तयार करून नियमबाह्य पद्धतीने आयटीसी मिळवले आणि ते इतर कंपन्यांना पुढे हस्तांतरित केले.
इतकेच नव्हे तर ATPL कंपनीने अस्तित्वात नसलेल्या किंवा रद्द झालेल्या पुरवठादारांकडूनही सुमारे २०. १९ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. आतापर्यंतच्या चौकशीनुसार, या संपूर्ण नेटरवर्कद्वारे टब्बल ३७.६७ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. आतापर्यंतच्या चौकशीनुसार, या संपूर्ण नेटवर्कद्वारे तब्बल ३७.६७ कोटी रुपयांचे नियमबाह्य आयटीसी मिळवण्यात आले, तर सुमारे ४०.२९ कोटी रुपयांचे बोगस आयटीसी इतर कंपन्यांना बेकायदेशीररीत्या पुढे पास करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणामुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे असून, या घोटाळ्यात आणखी काही कंपन्या आणि व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.






