संग्रहित फोटो
सध्याच्या घडीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुरेंद्र गुदगे हे कसलेले उमेदवार असून, तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत त्यामुळे या गटावर त्यांची मोठी पकड पहावयास मिळते. जिल्हा परिषद गटात कोट्यावधी रुपयांची त्यांनी विकास कामे केली असून, प्रत्येक गावागावात विकास कामाचा त्यांनी डोंगर उभा केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी सध्याच्या घडीला सुरेंद्र गुदगे यांचे पारडे जड दिसत असले तरी नव्याने इनिंग सुरू करणारे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरज पाटील यांचेही पारडे जड दिसत आहे त्यांना पक्षाची मोठी साथ लाभणार असून, त्यांच्याबरोबर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचा अनुभव कामी येणार आहे. डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचे या गटातील गावागावात त्यांचेही अनेक कार्यकर्ते असल्यामुळे आणि सद्यस्थितीला मंत्री जयकुमार गोरे यांचा वरदहस्त सुरज पाटील यांच्या डोक्यावर असल्यामुळे सध्याच्या घडीला तरी सुरेंद्र गुदगे यांना टफ फाईट द्यावी लागेल.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पि. डी .सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पि. डी. सावंत हे हिवरवाडी गावचे रहिवासी असून, त्यांनी गावाचे नेतृत्व केलेले आहे. सामाजिक कार्याची आवड असणारे सावंत हे राजकीय पटलावर उगवता तारा म्हणून मायणी गटात आपले नशीब आजमावत आहेत. ते एक या भागातील निष्णात वकील म्हणून नावारुपाला आलेले आहेत. आपल्या वकिली व्यवसायातून मायणी गटात त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून, अनेक गोरगरीब लोकांच्या केसेस त्यांनी विना मोबदला लढलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात मोठी सहानभूती असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत त्याचा फायदा नक्कीच होईल. परंतु त्याचा अर्ज राहणार की काढून घेणार? हे 27 तारखेलाच समजेल. जर त्यांचा अर्ज राहिला तर ते जॉईंट किलर म्हणून प्रस्थापितांना मोठा धक्का देऊ शकतात.
शेखर गोरे गटाचे राजुशेठ झगडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, आपणही या रेसमध्ये असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. मी ओबीसी असून ही निवडणूक लढवित आहे. ओबीसी समाज आपल्याच पाठीशी उभा राहून आपल्याला मतदान करेल व मायणी गटाचे नेतृत्व करण्याची मला संधी देईल, असा विश्वास राजूशेठ झगडे यांना वाटत आहे. परंतु वरिष्ठ लेवलला काही खलबत्ते होऊन राजू शेठ झगडे यांचा अर्ज कायम राहणार की निघणार हेही पाहणे रंजक ठरेल त्यामुळे मायणी गटात सध्याच्या घडीला तरी कोण कोणाला चेकमेट देणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.






