फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. नेशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NMDC Steel) ने 943 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2025 आहे. ही भरती स्टील मेल्टिंग शॉप, ऑक्सिजन प्लांट, सेंट्रल रिसर्च लॅब, LDCP, थिन स्लॅब कास्टर, डिस्पॅच कमर्शियल अशा विविध विभागांमध्ये होणार आहे. 24 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
वर्गनिहाय रिक्त पदांचा तपशील असा आहे. अनारक्षित वर्गासाठी 376 पदे रिक्त आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी 93 पदे रिक्त आहेत. इतर मागासवर्गीय (OBC – NCL) साठी 241 पदे तर अनुसूचित जातींसाठी 155 पदे रिक्त आहेत. अनुसूचित जमातींसाठी 69 पदांची भरती होणार आहे. एकंदरीत, सर्वच वर्गांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BE, B.Tech, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, ITI, पोस्ट ग्रॅज्युएशन, MBA, CA, MA, PGDM यापैकी कोणतीही एक मान्यताप्राप्त पदवी असावी लागते. यासोबतच संबंधित क्षेत्रात किमान 4 वर्षांपासून ते 21 वर्षांपर्यंतचा अनुभव असणे आवश्यक आहे. कोणत्या पदासाठी किती अनुभव लागतो, हे पदानुसार वेगळं असणार आहे. वयोमर्यादेच्या दृष्टीने, उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 50 वर्ष ठेवण्यात आली आहे. मात्र आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
या भरतीमध्ये कुठलीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पद आणि अनुभवाच्या आधारे ₹40,000 ते ₹1,70,000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते. उमेदवारांनी nmdcsteel.nmdc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे आहे. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत थांबू नका, आजच अर्ज करा!