फोटो सौजन्य - Social Media
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) ने अप्रेंटिस पदांसाठी 145 जागांची अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिसूचना दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांना 15 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ही भरती पदवीधर तरुणांसाठी एक चांगली संधी असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे असावे. शासन नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी नक्कीच साधावी.
भरती प्रक्रिया ही तीन टप्प्यात पार पडणार आहे. सर्वप्रथम उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली जाईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी होणार आहे. गुणवत्ता यादी ही शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेण्यात येणार नाही.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत अधिसूचना वाचून आपल्या पात्रतेची खात्री करून घ्यावी. त्यानंतर uiic.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि शेवटी अर्जाची छपाई काढून ठेवावी. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा योग्य कागदपत्रे संलग्न नसल्यास अर्ज फेटाळण्यात येऊ शकतो.
UIIC ही भारतातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी आहे. या कंपनीत अप्रेंटिस म्हणून कार्य करणे म्हणजे एक नामांकित संस्थेचा अनुभव मिळवण्याची संधी. भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी हा अनुभव उपयुक्त ठरू शकतो. म्हणूनच सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवून आपला अर्ज वेळेत भरावा.
महत्वाच्या तारखा:
अधिक माहितीसाठी uiic.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.